कारंजा (लाड)
...........................................
प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस उर्दू महिन्याच्या १२ तारखेला म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. मात्र १७ सप्टेंबरला श्री गणेश विसर्जन मिरवणूक असल्यामुळें, कारंजा शहरातील मुस्लिम बांधवांकडून,एकात्मतेची व सहकार्याची भावना ठेवून, ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त
दि. १८ सप्टेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये हजारो मुस्लिम भ बांधव सहभागी झाले होते.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त खास सजविलेल्या गाड्या,हिरव्या पताका,शुभेच्छा देणारे फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होते.डोक्यावर पगडी,सदरा अशा पारंपरिक पेहरावात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. या वेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली.
जुलूस-ए-मोहंमदी सकाळी ८.३० वाजता स्थनिक जामा मस्जिद येथून मिरवणूक सुरुवात करण्यात आली.तेथून सराफा लाईन,मेन रोड,दिल्ली वेश ,इंदिरा गांधी चौक,नेहरू चौक,स्टोअर लाईन,टिळक चौक,अमर चौक, दरोगा मस्जिद चौक,भाजी बाजार,जिजामाता चौक, अस्ताना,पोलिस स्टेशन, नगर परिषद,जे.सी.हाईस्कूल,चवरे लाईन, जे.डी.हाईस्कूल,बीबी साहबपुरा,काझीपुरा,महात्मा फुले चौक,जुना सरकारी दवाखाना, नगीना मस्जिद,सराफा बाजार येथून परत जामा मस्जिद मध्ये मिरवणूकीचा समारोप करण्यातआला.मागील अनेक वर्षांपासून ही मिरवणूक काढण्यात येत असून यात हजाराे नागरिक सहभागी होतात.प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी.हा यामागील उद्देश असल्याचे जाणकारांनी सांगितले. या निमित्ताने मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई,पताके,झेंडे लावून सजावट सुद्धा करण्यात आली होती.मिरवणूकी मध्ये सहभागी बांधवांसाठी सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अल्पोहर व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मिरवणूकीत जामा मस्जिदचे मौलाना अ.मजीद साहब,नगिना मस्जिदचे इमाम सय्यद अहमद,काजी मो. इकबाल,हाजी युसुफ पुंजानी, आदिंसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी देशमुख,शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केले होते.
डीजे विरहित मिरवणूक.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त खास सजविलेल्या गाड्या हिरव्या पताका शुभेच्छा देणारे फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते.डोक्यावर पगडी, सदरा अशा पारंपारिक वेशात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी डीजे मुक्त व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली व त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण शहर वासियांनी स्वागत केले.तसेच त्यांनी डिजे विरहित मिरवणूक काढल्याने लोकांसमोर एक आदर्श निर्माण केले आहे.
ईद-ए-मिलादची मिरवणूक १६ ऐवजी १८ तारखेला
गणेशोत्सवा दरम्यानच ईद-ए-मिलाद चा उत्सव असल्यामुळे यानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून,कारंजा शहर पोलिसांनी मुस्लिम समाजाला केलेल्या आवाहनाला समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. त्यामुळे ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका दि. १६ सप्टेंबर ऐवजी दि.१८ सप्टेंबरला काढण्यात आली. यामुळे कारंजा शहरातील मुस्लीम समाजाने शहरातील बंधुता, एकात्मता व समतेचा चांगला संदेश दिल्याचे दिसून आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....