अकोला:- समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दि. 9 जून रोजी राठोड पंच बंगला शिवाजीनगर या ठिकाणी सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सर्वप्रथम तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर समाजाचे अध्यक्ष दिलीप भाऊ नायसे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये त्यांनी समाज हिताच्या केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला आणि समाजाला मोठं करण्याकरिता आणखी कोणकोणत्या बाबी आहेत ते लक्षात आणून दिल्या कार्यक्रमाला भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मारोतीराव गोतमारे हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती होते कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंजी भिरड उपस्थित होते आणि आजच्या टेक्नॉलॉजीचा शिक्षणामध्ये कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल हे श्री विष्णू भाऊ मेहरे यांनी आपल्या अध्यक्षाच्या भाषणांमधून उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले शिक्षणाचे महत्त्व प्रा. प्रकाशजी डवले यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे आपल्या भाषणातून लक्षात आणून दिले महिला आघाडीचे अध्यक्ष सौ पुष्पाताई वानखडे यांनी सुद्धा उपस्थित मुलींना बाहेरगावी शिकत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी यावर विशेष भर दिला संताजी कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक मंगेश वानखडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निसर्गाचे सुद्धा संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे असे आपल्या भाषणातून स्पष्ट केले संजय आकोटकार यांनी आपले वडील स्व. नामदेवराव अकोटकार यांच्या स्मृती पित्यर्थ चाय, पाणी व नाश्ताची व्यवस्था केली. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु.माही साखरकार, राम राऊत, रुद्र रायपुरे, राजनंदिनी मालगे,हर्षा ढवळे, प्राची काटोके, वृषाली असलमोल,सुजल सोनटक्के, तनुश्री नायसे, सेजल सोनटक्के, आदित्य झापर्डे, रिद्धी पांडव, युवराज गोदे, निखिल नालट, अंकुर डोईफोडे, तनिष पांडव यांच्यासह आणखी 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक आघाडी अध्यक्ष गोपाल झापर्डे, निलेश मालगे, राजेश भाऊ वानखडे, वसंतराव सोनटक्के, राजेश भाऊ सोनटक्के, पप्पू वानखडे, नितीन झापर्डे, विजय थोटांगे, निलेश खांदेल, राम भिरड, शशिकांत सापधारे, अतुल गोमासे, मंगेश चोपडे, नंदु चोपडे, प्रकाश झापर्डे, एडवोकेट आनंद गोदे , विशाल गमे, राजू नायसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीजी कोचिंग क्लासेस संचालक अनिल वानखडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट देवाशिष भाऊ काकड यांनी केले .