धान कापणीच्या कामाला वेग आले असल्याने सर्वत्र धान कापणी जोमात सुरु झाली आहे. अशातच आरमोरी वरुन अवघ्याच पाच किमी अंतरावर असलेल्या रामाळा शेतशिवारात धान कापण्याकरिता गेलेल्या महिला मजुरावर वाघाने अचानक हल्ला करुन ठार केल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार ताराबाई एकनाथ धोडरे असे मजुर महिलेचे नाव असुन ती (काळागोटा) आरमोरी येथील रहिवासी आहे.सदर घटनेची माहीती वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मोका चौकशी करून पंचनामा केला आहे
सदर महिला रामाळा येथील शेत शिवारात धान कापणीच्या कामाकरता गेली असताना लपुन बसलेल्या वाघाने महीलेवर अचानक बेसावध हल्ला करुन ठार केले ही घटना आज दि.19 ऑक्टो.दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास घडली.
सदर घटनेमुळे परिसरातील जनतेमधे भीतीचे वातावरण पसरले असून शेतीचे काम करायची कशी असा प्रश्न शेतकर्यांत निर्माण झाला आहे.तसेंच 15 दिवसापासून रामाळा ते वैरागड रोड संयकाळी बंद करण्यात येतो यावर वनविभागाने जातीने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी सदर वाघास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे