कारंजा शहरात लोकप्रतिनिधींच्या सपशेल दुर्लक्ष्यामुळे आणि मुख्य म्हणजे नगर परिषदेच्या प्रशासकिय कारभाराला कारंजाचा नागरीक पूर्णपणे कंटाळलेला असून,शहराच्या विकासाचे तिन तेरा वाजलेले आहेत.तरी येथील स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी,झोपेच सोंग घेऊन निर्धास्त असल्यामुळे,त्यांना तर जाग येणे शक्यच नाही.शिवाय कारंजा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे आणि प्रशासकांना सुद्धा सर्व काही कळते,पण त्यांचे लक्ष्य जुन्या शहरातील रस्त्यांकडे वळतच नाही.रस्ते दुरुस्त करून पावसाळ्याच्या दिवसात त्याची डागडूजी करून,जुन्या शहरातील कमीतकमी शाळा महाविद्यालयाच्या आणि प्रमुख मार्गाचे रस्ते दुरुस्त केले पाहीजे असे त्यांना वाटतच नाही. हे एक कटूसत्य आहे.कारंजा येथील नगर पालिकेचा वर्षभर केवळ एकमेव उद्योग सुरु असतो आणि तो म्हणजे जुलै ते मार्च असे नऊ महिनेपर्यंत फक्त पुढील वर्षाची मालमत्ता कराची (घरपट्टीची) वसूली करणे.सध्या 2022-23 चे आर्थिक वर्ष समाप्त होऊन मार्च महिन्याला केवळ चारच महिने झालेले असतांना,कारंजा नगर पालिकेने जुलै महिन्यापासूनच पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच सन 2023-24 च्या,मालमत्ता कराची (घरपट्टीची) वसूली सुद्धा अगदी राजरोसपणे सुरू केलेली असून, मालमत्ता धारकांना पुढील वर्षाच्या कराचा भरणा करण्याच्या बिलांच्या नोटीस सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.मात्र केवळ करवसुली चांगल्याप्रकारे अगदी 100 % वसूल करणारी, कारंजा नगर पालिका नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरली आहे.वास्तविक आज रोजी नगर पालिकेचा कारभार पुर्णतः प्रशासकिय अधिकार्याकडे असल्यामुळे, उलट अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत, आपल्या शिल्लक निधीमधून किंवा शासनाकडून निधी उपलब्ध करून शहरातील रस्ते पावसाळ्या पूर्वीच दुरुस्त करून घ्यायला हवे होते.तसेच कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे सर्वेसर्वा असलेले आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन पावसाळ्यापूर्वीच जुन्या शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम करून घ्यायला पाहीजे होते.परंतु तसे झाले.त्यामुळे जुन्या शहरातील सर्वच प्रमुख मार्गांची चाळण झालेली असून,शाळकरी मुलामुलींने रस्त्याने जातांना सायकली कशा चालवाव्यात आणि रस्त्याने कसे चालावे हे सुद्धा कळत नाही. रस्त्यांने चालतांना खड्डे चुकविण्याच्या नादात रहदारीतील इतर वाहने कार,अँटो अचानक आडवी येतात आणि मुला मुलींना सुद्धा आपल्या सायकली खड्डे चुकविण्याकरीता फार मोठी सर्कसच करावी लागते. त्यामुळे दररोज या पावसाळ्याच्या दिवसात मुल मुली सायकली घेवून रस्त्यात पडतात.त्यांची वह्या पुस्तके दफ्तर भिजतात. कपड़े रस्त्यावरील चिखलाने माखतात तरी यावर आतातरी,आमदार राजेंद्र पाटणी कारंजा विधानसभा मतदार संघाचे सदस्य या नात्याने,नगर पालिकेला तात्काळ जुन्या शहरातील रस्ते दुरुस्तीचे आदेश देऊन काम करून घेतील काय ? अशी अपेक्षा कारंजा येथील दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे.