वरोरा :- वरोरा - चिकणी या मार्गावरील दिड महिन्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने या मार्गावरील असलेला पूल खचुन रस्त्याचे मधोमध मोठा गड्डा पडला त्यामुळे चारचाकी वाहनाचा दळनवळनाचा मार्ग बंद झाला.
वरोरा चिकणी मार्गावरील बंडू खारकर यांच्या शेताजवळ पूल आहे हा पूल झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धा पूल खचुन वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील होणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाळा असल्याने शेतीची मशागतीचे , खताचे काम शेतकरी यांना करावे लागते. परंतु हा पूल पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने शेतकरी वर्गाला खते अन्य वस्तूची वाहतूक करण्यासाठी अडचनीचा सामना करावा लागत आहे. तसेच चिकणी या गावाला येणारी बस 3 आठवड्यापासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना वरोरा शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकरी , विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर करून या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी चिकणी येथील नागरिक , शेतकरी , विद्यार्थी करीत आहे.