अकोला- श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अकोट येथील महाविद्यालयात ४ दिवसीय शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या शिवमहोत्सवा च्या दुसऱ्या दिवशी व्याख्यानासाठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. राजेश पाटील ताले प्रमुख वक्ता म्हणून उपस्थीत होते.याप्रसंगी "शिवचरित्रातुन आजच्या तरूणपिढीने काय आदर्श घ्यावा?" ह्या विषयावर उपस्थितांशी त्यांनी व्याख्यानातून संवाद साधला.
याप्रसंगी
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून करीत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा प्रा.राजेश पाटील ताले यांना सन्मानित करण्यात आले.श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री.दिलीपबाबू इंगोले,उपाध्यक्ष अॕड.गजानन पुंडकर आणि मा.श्री.केशवराव मेतकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष,युवाव्याख्याते प्रा.राजेश पाटील ताले यांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य,प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत २०० शिवचरित्र विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष प्रतीक ताले,भूषण ताले व राहुल ताले यांनी २०० शिवचरित्र श्री.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पांडे सर यांच्याकडे सुपूर्द केले.