नवी मुंबई ते आनंदवन हा 800 किलोमीटर सायकलचा प्रवास करीत साईप्रसाद शेळके सुयोग पाडेकर व आकृती शेळके हे आयटी सेक्टर मध्ये काम करणारे तीन युवक कारंजात पोहोचले.कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या ठिकाणी त्यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तीन वर्षांपासून अंध अपंग कर्णबधिर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी जनजागृती करीत त्यांच्यासाठी मदत मिळवण्यासाठी सायकल यात्रा काढत असतात.2021 ला त्यांनी मुंबई ते गोवा ब्लिटेक कर्णबधिर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी तर 2022 ला पुणे ते कन्याकुमारी एनएडब्ल्यू पीसी त्या सामाजिक संस्थेकरीता मदत निधी मिळावी म्हणून सायकल यात्रा काढली होती. पुणे ते कन्याकुमारी या यात्रेत साईप्रसाद शेळके सुयोग पाडेकर व आकृतीसह प्रसाद कावडे हे सायकल वीर सहभागी झाले होते.यावर्षी त्यांच्या यात्रेचे हे तिसरं वर्ष असून साईप्रसाद शेळके सुयोग पाडेकर व आकृती शेळके हे नवी मुंबई ते आनंदवन हा प्रवास ते आनंदवनातील कर्णबधिर मुलांच्या मदतीसाठी करीत आहेत.यावेळी ते आर्थिक स्वरूपातील मदतही स्वीकारत आहेत.आतापर्यंत तब्बल एक लाख अठरा हजार रुपये जमा झाले आहेत.आज त्यांच्या यात्रेचा सहावा दिवस होता.22 डिसेंबरला हा प्रवास नवी मुंबईपासून सुरू झाला तो व 30 डिसेंबरला आनंदवनात संपणार आहे.हे तिघही सायकलवीर उच्च विद्या विभूषित असून चांगल्या पदावर नोकरी करतात.साईप्रसाद व आकृती शेळके हे अभियंता आहेत तर सुयोग पाडेकर यांनी आपली पदवी पूर्ण केलेली आहे.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीशी या तिघाही सायकलस्वारांनी मुक्तसंवाद साधला.मुलांनी त्यांच्या मनातली प्रश्नही यावेळेस या तिघांना विचारले. मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला विचारपीठावर मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड साईप्रसाद शेळके,सुयोग पाडेकर,आकृती शेळके,पर्यवेक्षक विकास रुईकर ,पर्यवेक्षक गोपाल खाडे,अरुणराव चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता दिलीप आंबेकर,धनंजय घुले,रूपाली लोखंडे,दिपाली खोडके,पुष्पा व्यवहारे,डॉ.संगीता केंदळे,रूपाली तायडे,सतिश चव्हाण,सारंग गुल्हाने,प्रशांत वार्डेकर, आशिष बागडे सुमित्रा डाबेराव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसुत्रसंचलन गोपाल खाडे यांनी तर आभार नीता तोडकर यांनी मांडले.