नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास शामराव कोरेवार यांच्या मालकीच्या बैलांवर वाघाने हल्ला करून ठार केले. कोरेवार यांच्या घरालगत झुडपी जंगल असल्याने नेहमी येथे वन्यप्राण्यांच्या वावर असतो. काही दिवसांआधी येथे दोन अस्वलींचा मुक्काम होता. दरवर्षी या परिसरात शेळ्या, बकऱ्या, बैल यांची शिकार करण्यासाठी वाघ येतो, असे जनतेचे म्हणणे आहे. पहाटे वाघाने बैलावर हल्ला करताच आरडाओरड झाल्याने वाघ पसार झाला.