अकोला:= दरवर्षी मोठ्या उत्साहाने जगभरात जागतिक जैव इंधन दिवस साजरा केला जातो,त्याप्रमाणे भारतात सर्वात मोठ्या उत्साहाने हा दिवस **मुंबई स्थित मीरा क्लीन फ्यूल्स लिमिटेड कंपनी* (MCL मुंबई) गेल्या दहा वर्षांपासून हा दिवस साजरा करीत आहे,भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर करण्या करिता या कंपनी मार्फत मोठ्या प्रमाणात 2030पर्यंत हे मिशन राबवण्यासाठी ग्रामीण पातळीवर कार्य चालू आहे, मुंबई स्थित हॉटेल सहारा, विले पार्ले च्या भव्य दिव्य सभागृहात दिवसभर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ,या कार्यक्रमात देशभरातून दोनशे चे वर उद्दोजक
सहभागी होत असून , अकोलातील सात पैकी चार युवा उद्दोजकाना सहभागी होण्याचा संनमान प्राप्त झाला. आहे,
1) अकोला येथील उद्दोजक विश्वास देशमुख,संचालक शाश्वत वराड क्लीनफ्यूल्स* प्रा.ली,.
2) पातूर येथील उद्दोजक छगन राठोड,संचालक शीला क्लीन फ्युल्स प्रा.ली .
3) मूर्तिजापूर येथील Dr. हेमंत बंड,संचालक निर्मलान बायो फूल्स प्रा.ली.,
4) बार्शीटाकळी येथील भगवान चव्हाण,संचालक महावंदान क्लीन फ्युअल्स प्रा.ली यांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे,या कार्यक्रमा निमित्त प्रकल्प उभारणी साठी MCL सोबत सामज्जस करार होत असून अकोला जिल्हात जवळपास दोनशे कोटींची गुंतवणूक करणार असून त्यामध्यमातून प्रकल्पात तयार होणाऱ्या उत्पादना मुळे अकोला जिल्हा प्रदूषण मुक्त होऊन ,बेरोजगारी मुक्त सुद्धा होईल ,प्रतेक तालुक्यातील गाव खेड्या मध्ये शेतकऱ्याच शेतातील हत्ती गवत लागवडीला देऊन हमी भावाने विकत घेण्यासाठी शेतकऱ्या सोबत करार करून त्यांना प्रतीमहा आठ ते दहा हजार उत्पन्न देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ,तसेच प्रकल्प च्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात दोन ते चार हजार लोकांना रोजगार प्राप्त होतील ,प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ग्राम उद्दोजक नियुक्त केल्या जात आहे,त्यांना गाव पातळीवर चांगले उत्पन्न देऊन यांच्या माध्यमातून गाव सुजलाम सुफलाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,प्रकल्पात तयार होणाऱ्या जैव इंधनच्या (बायो सी.एन जी) गॅस,घरगुती गॅस,जैविक खत च्या वापरामुळे वातावरण प्रदूषण मुक्त होईल ,पेट्रोल , डिझेल च्या वापरावर नियंत्रण येईल,त्यामुळे सरकारचे इंधन आयाती साठी जाणारा पैसा वाचेल,तसेच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी गावा गावातील शेतकऱ्यांना प्रो्साहन दिला जाईल व त्यांचे उत्पादन गावातच खरेदी केल्या जाईल त्यामुळे शेतकऱ्या मोबदला चांगला मिळेल व नागरिकांना शुद्ध अन्न,शेतीपूरक उद्योगांमध्ये सुद्धा कंपनी आग्रेसर राहील व यातून सुद्धा मोठा रोजगार महिला बचत गटांना जिल्हात उपलब्ध होईल
या कार्यक्रमामध्ये जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्त साधून यासोबत विदर्भातील वरोरा,राजुरा,कोरपना, मुल,चिमूर, भद्रावती, पोंभूर्ना, सिंदेवही,बल्लारपूर,कळमेश्वर,हिंगणघाट,यावल,अहमदपूर,चाकुर असे संपूर्ण भारतातून दोनशे उद्दोजका सोबत सामज्जस करार करण्यात येणार असून लवकरच त्यांच्या प्रकल्प उभारणी करिता सुरवात केल्या जाणार आहे व या वर्ष अखेरीस दोनशे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट MCL चे आहे,असे एका पत्रकद्वारे कंपनी चे सिनियर प्राईम बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांनी कळविले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....