चार ते पाच गंभीर जखमी..!मोटेगाव पेंढरी च्या मधोमध मार्गात झालेली भीषण घटना.!सिंदेवाही येथे रुग्णवाहिका ने उपचारासाठी भरती
चिमूर सिंदेवाही मार्गावरील मोटेगाव पेंढरी च्या मधोमध दि 16 जुलैला दुपारी 12 वाजता दरम्यान मिनी मालवाहक टाटा एस आणि इंडिगो कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली यात पाच जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते तात्काळ रुग्णवाहिका ला पाचारण करून गंभीर रुग्णांना सिंदेवाही येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर ला रवाना करण्यात आले.
सविस्तर असे की सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील तीन महिला व चार पुरुष इंडिगो कारने मुक्ताबाई पर्यटन स्थळ पाहण्यासाठी जात असताना पेंढरी च्या समोर मोटेगाववरून नवरगाव कडे जाणारा मिनी मालवाहक टाटा एस क्र एम एच 40 सि एम 2629 जात होता या दोन्ही वाहनांची मोटेगाव आणि पेंढारीच्या मधोमध जोरदार समोरासमोर टक्कर झाली ही धडक इतकी जोरदार होती की इंडिगो कार रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेली तसेच पलटी मारल्या गेली सुदैवाने जीवितहानी झाली नसून पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले त्याना उपचारासाठी चंद्रपूर ला रवाना केल्याची माहिती मिळाली आहे सदर धडकेत दोन्ही वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.