चंद्रपूर : घुग्घूस येथील गांधी नगर वेकोलीच्या वसाहतीत 28 वर्षीय विवाहीत युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (11 जून) सायंकाळी घडली. वर्धन्य रमणय्या पेंडोटा (वय 28) असे मृत युवकाचे नावं आहे.
आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तो विवाहीत असून त्यांनी अभियंताचे शिक्षण घेतले असून तो नौकरी करीत असल्याचे सांगितले जाते मात्र आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शव विच्छेदन करण्याकरीता पाठविण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहे.