कारंजा : सध्या कारंजा नगर पालिका प्रशासकिय अधिकार्यांच्या ताब्यात असून, बिल्डीग वरील राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडलेले आहे. तेव्हा कारंजा नगर पालिकेवरील बंद घड्याळ काढून, तिथ कमळ फुलवायचे असेल . आणि भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून आणायचा असेल तर भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजेंद्र पाटणी यांनी, कारंजा शहराच्या विकासाबाबत दक्ष राहून, प्रशासकिय अधिकार्यांकडून, शहरातील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे निर्भिड मत कारंजेकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे . सध्या भाजपाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच नगर पालिकेतून जास्तितजास्त नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे . आगामी चार पाच महिन्यात कारंजा नगर पालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे व या निवडणूकीत जर भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून आणावयाचा असेल तर मात्र, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांना, अगदी डोळ्यात तेल घालून म्हणजेच काळजीने लक्ष्य पुरवून कारंजा नगर पालिकेकडून कारंजाचा विकास करावाच लागेल असी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.