आज दिनांक 14 जानेवारी 2025 रोज मंगळवरला श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त ई 11 वी व 12 वी (कला व विज्ञान) च्या विद्यार्थ्याना करीता सध्या नागपूर आणि गडचिरोली येथे सुरू असलेल्या कल्पतरू स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक श्री मा. कुणाल पडलवार यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच करियर च्या क्षेत्रातील विविध विभाग आणि व त्यातील स्पर्धात्मक आव्हाने यावर खूप सखोल असेल मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाला आमच्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राचे प्रमुख श्री अमोल नैताम सर , श्री म्हाशाखेत्री सर आणि श्री मनीष राऊत सर यांचे उत्तम सहकार्य लाभले . सदर कार्यक्रमाला ई 11 वी व 12 वी कला व विज्ञान चे एकूण 193 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चंद्रशेखर बर्वे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नरेश लाडे सर यांनी केले.