आर जे चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट शाळेने नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा केला महिला दिन.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी !
या उक्तीप्रमाणे विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याला नमन करण्यासाठी व त्यांचा कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने शाळेच्या वतीने विविध क्षेत्रात आपली जबाबदारी अतिशय कल्पकतेने निभावणाऱ्या महिलांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन मुख्याध्यापिका ,विद्यार्थी व शिक्षकांनी सत्कार केला. सत्काराचे स्वरूप शाल , पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यांच्या कार्याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.
यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २०२४ हे वर्ष म्हणून चोवीस विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती महिला - आर जे सी किड्स संचालिका व लेखिका सौ दिपाली ताई चवरे , कारंजा शहर पोलीस एपीआय सौ वासनिक मॅडम पीएसआय सौ अंभोरे मॅडम ,निर्भया पथक प्रमुख शहर पोलिस स्टेशन संगिता मुरादे , नगरसेविका सौ. प्राजक्ता माहितकर , वसुंधरा प्रकल्प सौ. लांडे मॅडम , जलपाटबंधारे विभाग शालिनी नाईक (राठोड) सामान्य अस्थापना तहसिल कार्यालय पंचायत समिती काळसपे॔ मॅडम ,समाज कल्याण विभाग सौ .मापारी मॅडम,बी.के शिवानी - मालती दिदी, भाजीबाजार बॅक मॅनेजर सौ .लकडे मॅडम , साहाय्यक प्रशासन अधिकारी पं.स.कारंजा अपर्णा जाधव ,तालुका प्रोजेक्ट साहाय्यक पंचायत समिती कविता पेठे (गणोजे) , पोस्टाच्या शाळेतील शिक्षिका साखरकर मॅडम, आगार वाहतूक निरीक्षक आंबटपूरे मॅडम आगार वरिष्ठ लिपिक सौ भुसाटे मॅडम,आगार बस डेपो वरिष्ठ मेकॅनिक सविता ठाकरे, आगार बस डेपो वाहक सौ कुमरे, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय लॅब टेक्नीशियन स्मिता देशपांडे,उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,गवई मॅडम सफाई कर्मचारी डेंडूळे ताई,,सविता काळे मॅडम, सौ. हेडाऊ मॅडम न.प. ग्रंथालय प्रमुख,न.प. जन्म मृत्यूची नोंदणी कर्मचारी सौ. दुर्गा खोडके या महिलांचा सत्कार महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या मुख्याध्यापिका,विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केला. कामाचे स्वरूप त्यांनी विदयार्थ्याना समजावून सांगितले घर आणि कार्यक्षेत्रात आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या सर्वच महिलांच्या कार्याला आमचे शतशः नमन !या उपक्रमात सहभागी विद्यर्थिनी तनिषा सुरळकर, वेदिका दहातोंडे अदिती सुडके, ईश्वरी पंधे, आराध्या नेमाने,सांची जाधव,पूर्वजा चौधरी,श्रावणी जाधव,,अनघा धानोरकर, संस्कृती भड ,आदिती वानखडे,खुशी राठोड, भुमिका भोयर, शर्वरी सातरोटे, किर्ती चव्हाण,संध्या गजभार.विधी मेहेत्रे,स्वराली खरडकर,आर्या राऊत, चार्मी सागाणी,कोमल बोरकर,वैष्णवी नवघरे, अस्मिता गणराज,आरुषी भगत,अधिष्ठा कदम, आराध्या सोळंके, मंजूश्री लुंगे, अदिती दरेकर ,श्रावणी काळे, भूमिका भोयर.
या उपक्रमासाठी कारंजा एज्युकेशन सोसायटी सचिव, संचालक सदस्य,मुख्याध्यापिका , विद्यार्थ्यांचे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....