जाफराबाद:- जाफराबाद शहरातील ज्ञानसागर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व भाजपाचे नगरसेवक सुरेशजी दिवटे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन आमदार संतोष पाटील दानवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी बदलत्या जीवन शैलीमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य निरोगी कसे ठेवता येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे गोरगरिब जनतेसाठी आरोग्य व रोगनिदान शिबिराचे लोकोपयोगी उपक्रम राबविणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले.
यादरम्यान आरोग्य शिबिरात 350 रुग्णांनी तपासणी करून उपचार करून ओषधीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार डॉ. सारिका भगत, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, भाजपा तालुकाध्यक्ष नाना भाऊ भागिले, साहेबराव कानडजे, माजी सभापती राजेश चव्हाण, सुरेश दिवटे, प्रा. विनोद हिवराळे,प्रा. डॉ रमेश देशमुख. अमोल कोलते, डॉ. चंदाराणी, डॉ. अमीन तडवी, डॉ राजू साळवे, अमोल पडघान, उमेश अब्दुलवाड बी के जाधव, सचिन जैस्वाल, सागर लोखंडे, किसन मुट्ठे सीताराम जंजाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.