कारंजा (लाड): कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघावर पूर्वीपासूनच बाहेरगावच्या नेत्यांनी सत्ता गाजवीली आहे.परंतु एक दोन आमदार सोडले तर इतर आमदारांनी सत्ता भोगायची येथील आणि विकास निधी पळवायचा स्वतःच्या गावाकडे. एवढेच काम केलेले आहे.त्यामुळे मतदार संघात औद्योगीक वसाहती,उद्योग धंदे, रोजगार,उच्चशिक्षण व्यवस्था, तिर्थक्षेत्र विकासापासून मतदार संघ पूर्णपणे अनभिज्ञ राहून कोसो दूर गेलेला आहे.त्यामुळे अलिकडच्या काळात मतदारांकडून,स्थानिक नेत्याची आमदार म्हणून मागणी होत आहे.विकासयोध्दे,सहकार नेते,सुनिल बाबासाहेब धाबेकर पाटील यांनी गेल्या आठ दहा वर्षांपासून,कारंजा मानोऱ्याला त्यांची कर्मभूमी मानून येथील मतदाराच्या सुखदुःखात सहभागी होत येथे दांडगा जनसंपर्क व जनसंवाद वाढवीला असल्यामुळे त्यांचे हजारो चाहते मतदार संघात निर्माण झालेले आहेत.शिवाय कारंजा मानोरा तालुक्यात त्यांच्या घाटोळे पाटील समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांची गणणा येथील स्थानिकांमध्येच होत असते. शिवाय सुनिल धाबेकर पाटील हे स्वामी समर्थ आध्यात्मिक केन्द्राशी जुळलेले असल्यामुळे ते धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीचे आहेत.एक प्रामाणिक, चारित्र्यवान,निष्ठावान आणि कट्टर सेवाभावी नेता म्हणून त्यांची ओळख आहे.तसेच येथे त्यांचे हजारो चाहते आणि घाटोळे पाटील समाजाचे प्राबल्य असल्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवीली तर यश त्यांनाच मिळणार आहे.म्हणून अपराजित ठरणारा विजेता या नात्याने मतदार संघातील सर्वधर्मिय मतदार त्यांच्याकडे पहात आहे.आजच्या परिस्थितीत त्यांच्या सारखा नेता कोणत्याच राजकिय पक्षात नसल्यामुळे मतदार संघातील हिंदु,मुसलमान,बहुजन,गवळी, बंजारा,ओबीसी,मराठा,कुणबी, पाटील इत्यादी समाज बहुसंख्येने त्यांच्या सोबत आहे. येथील निवडणूक मग खासदाराची असो वा आमदाराची असो त्या निवडणूकी करीता घाटोळे पाटील समाजाचीच मते निर्णायक ठरतात.हे गेल्या 25, 30 वर्षाच्या निवडणूका पाहिल्या असता दिसून येते.त्यामुळे महाविकास आघाडी व आघाडीतील घटक पक्षांनी, मतदार संघावर आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी आणि आपला विजय सुकर करण्यासाठी, खुल्या दिलाने-एकमताने सुनिल पाटील धाबेकर यांनाच उमेद्वारी दिली पाहिजे.अशी मागणी ज्येष्ठ दिव्यांग सेवक संजय कडोळे आणि प्रदिप वानखडे यांनी लावून धरली आहे.