मानोरा/कारंजा : सध्या बंगालच्या उपसागरात प्रचंड उलथापालथ सुरु असून,त्या वातावरणाच्या परिणामाने संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी वाऱ्याचा,कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे गेल्या दोन तिन दिवसां पासून,सध्या पूर्व विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य भरपूर पाऊस होत असून पश्चिम विदर्भातही बरेच ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे.सध्या हवामानाचा अंदाज पहाता आणखी तिन ते चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच मेघगर्जनेसह दमदार पाऊस होणार असल्याची शक्यता,वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील,ग्राम रुई गोस्ता येथील,आपल्या अचूक अंदाजानी,अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद वाशिमचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना व्यक्त केले आहे.सध्या सुरु असलेला पाऊस विदर्भातील तुर आणि कपाशीच्या (पराटीच्या) पिकाकरीता चांगला मानण्याचे बोलले जात आहे. मेघगर्जनेसह पाउसमानाचा अंदाज येत्या दोन तिन दिवस चांगला असून, त्यानंतर मात्र कमी कमी होत जाईल तर दि.10 ऑक्टोबर 2023 ला हिवाळ्याची चाहूल देत पावसाळा ऋतू संपलेला असणार आहे.तरी शेतकरी,ग्रामस्थ यांनी पाऊसाचा अंदाज घेत शेतातील कामे उरकावीत.ढगांचा गडगडाट आणि विजा चमकत असतांना हिरव्या झाडा खाली आसरा घेऊ नये.विजेच्या खांबाला स्पर्श करू नये. झाडाजवळ - विजेच्या खांबाजवळ गुरेढोरे उभी करू नये.पाण्याच्या प्रवाहामधून, पुलावरून आपली गुरेढोरे किंवा वाहने काढू नये व स्वतःही जाऊ नये.आपात्कालिन परिस्थिती उद्भवण्यापूर्वी जिवीताची काळजी घ्यावी असे आवाहन करंजमहात्म्य परिवार आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदे कडून करण्यात येत असल्याचे संजय कडोळे यांनी सांगीतले.