कारंजा लाड -- पक्षांतर्गत गटबाजी हि कांग्रेस ची सर्वात मोठी समस्या ह्यामुळे ह्याचा विपरीत परिणाम हा पक्षाच्या कार्यक्रमांवर होत असुन ह्याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस कार्यक्रमातील रोडावत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय असुन नेमकी हिच बाब हेरून कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे स्कॅनिंग करण्याचे ठरविले आहे. नानाभाऊ पटोलेंच्या ह्या निर्णयाचे वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी एका पत्रकाव्दारे स्वागत केले आहे.
पत्रकात अँड संदेश जिंतुरकर ह्यांनी पुढे नमूद केले आहे की येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकीत काँग्रेसचे चांगले प्रदर्शन व्हावे यासाठी तळागाळापर्यंत कांग्रेसची विचारधारा व आघाडी सरकार असतांना जनतेच्या हितासाठी विविध पातळ्यांवर केलेले कल्याणकारी कामे जनतेच्या दरबारात पोहोचणे आवश्यक आहे परंतु आपसी मतभेदांमुळे ती कामे जनतेपर्यंत पोहचू शकत नाही. आज एका पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम असेल तर दुसरा पदाधिकारी व कार्यकर्ते जात नाही ह्याचा कांग्रेस संघटनात्मक बांधणी वर विपरीत परिणाम होतो म्हणून कांग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या वतीने आयोजित सर्वच कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे नानाभाऊंचा हा स्वागतार्ह असुन ह्यामुळे मात्र गटबाजीला काही प्रमाणात तरी आळा बसेल असे अँड संदेश जिंतुरकर म्हणाले.
आज असी परिस्थिती आहे की अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाने निर्देश दिलेल्या स्थानिक व जिल्हा पातळीवरील कार्यक्रमास गैरहजर राहतात. स्वताला निष्ठावंत म्हणून मिरविणारे बहुतांश नेते पदाधिकारी व कार्यकर्ते गटातटाचे राजकारण करत एकमेकांच्या आंदोलने , मेळावे , मोर्चे , धरने आंदोलन , बैठका इ. कार्यक्रमात सहभागी होत नाही.
आता मात्र निर्देश देऊनही वारंवार पक्षाच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असुन नानाभाऊ पटोलेंच्या ह्या निर्णयाचे अँड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी समर्थन केले असून संपूर्ण प्रदेश स्तरावर समिती न बनविता विदर्भ,मराठवाडा ,कोकण ,प. महाराष्ट्र व मुंबई ह्या विभागस्तरावर कारवाईसाठी समिती गठीत करण्यात यावी असी मागणी पत्रकात अँड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी केली असल्याचे त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना स्वतः प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.