कारंजा : कारंजा शहराचा विकासच होऊ द्यायचा नाही ह्याची शपथ प्रशासकिय अधिकाऱ्यांनी घेतली की काय ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे . याबाबत अधिक वृत्त असे की, कारंजा शहरातील सुज्ञ नागरिक हे, इमाने इतबारे आपआपल्या घराचा, बंगल्याचा, दुकान प्रतिष्ठानचा कराचा भरणा वेळेवर करून, कारंजा नगर पालिकेला १०० % करवसुलीचे उत्पन्न मिळवून देऊनही, कारंजावाशी नागरीकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याला, मात्र नगर पालिका प्रशासन कमी पडत आहे. बाप्पांच्या विसर्जन मार्गावरील खड्डे पडून चाळण झालेल्या रस्तांवर मुरुम टाकण्यास कारंजेकरांचा विरोध असतांनाही कारंजा नगर पालिकेने, नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवून अखेर आपलीच मनमानी केली आहे . प्रत्येक डांबरी रस्तातील खड्डयावर डांबरीकरण व सिमेंट कॉक्रीटचा मलबा टाकण्या ऐवजी, मुरुम टाकण्याचे पाप ह्या नगर पालिकेने केले आहे. हा मुरूम डांबराच्या आणि सिमेंटच्या रस्ताला धरून रहात नसतो . उलट या मुरुमाने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी होऊन बसते. मात्र याचा विचार न करता नगर पालिकेनी अखेर बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर थातुरमातूर मुरुमाने डागडूजी केली असून त्यामुळे नगर पालिकेची टिका होत आहे . सध्या नगर पालिकेत लोकप्रतिनिधींची किंवा नगरसेवकांची सत्ता नसून सर्व कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आहे. व प्रशासकीय अधिकारी डोळे बंद ठेवून, नागरिकांची मागणी लक्षात न घेता नागरिकांचा विश्वासघात करून, आपला मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांच्या हिटलरशाहीचा निषेध व्यक्त होत आहे. आज कारंजाचा कोणी वालीच उरला नसल्यामुळे रस्तावर सांडपाणी येणे, चौकाचौकात कचऱ्याचे ढिग लागणे, विद्युत खांबावरील दिवे बंद असणे, रस्त्याची चाळण होणे, एकंदरीत सांगायचे म्हणजे असले प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. वाढणार आहे. त्यामुळे विकासमहर्षी आमदार राजेंद्र पाटणी यामध्ये हस्तक्षेप करून, अधिकाऱ्यांना धारेवर धरणार काय ? असा सवाल सुद्धा कारंजेकराकडून विचारला जात आहे.