कारंजा (लाड) : आपल्या वाशिम जिल्ह्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,दिव्यांगाच्या प्रती आस्था ठेवणारे जनसेवक व काँग्रेसचे सक्रीय व निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड.संदेशभाऊ जिंतुरकर हे आपल्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचेकडून अनेक वर्षांपासून दरवर्षी दुर्धर आजारग्रस्त व दिव्यांगाना उपयोगी पडणाऱ्या साधनांचे वितरण करीत असतात.त्या पायंड्या प्रमाणे याही वर्षी मंगळवार दि.05 सप्टेंबर 2023 रोजी काही दुर्धर आजार ग्रस्तांना उपयोगी पडणाऱ्या वॉकरचे वितरण सास संस्थे मार्फत करण्यात येणार आहे.तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा देवून वृक्षारोपण करण्यात देणार आहे. तसेच अँड.संदेश जिंतुरकर यांचे सर्वपक्षिय मित्र परिवारातील विविध संस्था,विदर्भ लोककलावंत संघटना,आदर्श जय भारत बहुउद्देशिय संस्था,ईरो फिल्मस एन्टरटेन्टमेन्ट,सास संस्था,नाट्य परिषद कलावंत, करंजमहात्म्य परिवार,युवक काँग्रेस,कांग्रेस सेंवादल, कॉंग्रेस कमेटी व अँड संदेश जिंतुरकर मित्रमंडळीच्या सहकार्याने, मंगळवार दि.05 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 07:00 वाजता श्री. कामाक्षा देवी संस्थान सभागृह कारंजा येथे सुमधूर अशा श्रावणधारा संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी मित्रमंडळीनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.ज्ञानेश्वर गरड,डॉ. इम्तियाज लुलानिया आणि रोमिल लाठीया यांनी केले आहे.