वाशिम - वाशिम जिल्हा पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रम्हकुमारी ओम शांती परिवार, नेहरू युवा केंद्र तथा अन्य योग सामाजिक संस्थांच्या वतीने शुक्रवार, २१ जून रोजी स्थानिक स्वागत लॉन येथे संपूर्ण पतंजली योग परिवाराच्या परिश्रमाने तसेच योगप्रेमींच्या अप्रतिम उपस्थितीत जिल्हास्तरावर योग दिवस महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार किरणराव सरनाईक, माजी आमदार विजयराव जाधव, राजू पाटील राजे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, दिलीप हेडा, डॉ. हरीश बाहेती, राहुल तूपसांडे, भीम जीवनानी, उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, माजी मुख्याधिकारी वसंत इंगोले, अॅड. खंडेलवाल, ब्रमहकुमारी स्वाती दीदी, डॉ. सरोज बाहेती, डॉ. घुनागे, सिमा राजगुरू, प्रा. संगीता इंगोले, बापु ठाकूर, योगतज्ञ तथा भारत स्वाभिमान पतंजली योग परिवाराचे जिल्हा अध्यक्ष डॉ. भगवंतराव वानखडे, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी शंकर उजळे, जिल्हा प्रभारी युवा भारत शिवशंकर भोयर, महिला प्रभारी महिला पतंजली योग समिती सौ. दीपा वानखडे, सुखदेव राजगुरू, नितीन घटमांल, गोपाल कोठेकर, अवघडे, पंत, झामरे, विलास ठाकरे, विठ्ठल ठाकरे, प्राचार्य जाधव, राजेश बोरकर, पुरुषोत्तम दुरतकर शैलेश, श्याम, संगीता राजगुरू, पंचभाई, राजू कलवार, महाले, मुसळे, बावणे, राजुरकर, गणेश गाभणे, प्रा. कहाते, अर्जुन चंदेल, मीना मापारी, सुलभा व्यवहारे, अंजू टावरी, बजाज, अघम, मालती दाभाडे आदींसह योगसाधिका व पुरुष कार्यकर्त्यांसह योग साधक योगशिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्वागत लॉनचे संचालक सुरेश लोथ यांचे विशेष सहकार्य लाभले. योगतज्ञ डॉ. भगवंतराव वानखडे, सौ. दीपा वानखडे, शंकर उजळे, ब्रह्मकुमारी स्वाती दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच पतंजली परिवाराच्या वतीने सतत दोन वर्षापासून जुनी आयडीपी कॉलनी येथील बॅडमिंटन ग्राउंडवर रोज सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत निशुल्क योग वर्ग सुरू होता व नियमित सुरूच राहील. तरी वाशिमकर जनतेने या निशुल्क योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भगवंतराव वानखडे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....