"स्वस्थ भारत आणि आध्यात्मिक सशक्तीकरण" या विषयावरील नॅशनल मिडीया कॉन्फरन्स 2024 आणि आखिल भारतिय पत्रकारीता महासंमेलनाचे भव्य आयोजन दि. 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत राजस्थान स्थित माऊंट आबू च्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय मुख्यालय शांतीबन आनंदसरोवर येथे करण्यात आलेले होते. त्याकरीता यावर्षी,प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय कारंजा केन्द्राकडून राजयोगिनी बि. के. मालती बहनजी यांच्या मार्गदर्शनावरून कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार से.नि.प्राचार्य अशोक उपाध्ये,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक पत्रकार संजय कडोळे,विजय खंडार,लोमेश चौधरी,प्रा. शंकरराव पुंड,प्रदिप वानखडे आदींना माऊंट आबू येथे पाठविण्यात आले होते.त्या ठिकाणी गेलेल्या पत्रकारांनी कारंजा केन्द्राचे यशस्वी प्रतिनिधीत्व करून,नॅशनल मिडीया कॉन्फरन्सच्या पाच दिवशीय सत्रात आपला सहभाग नोंदवीला.त्यानंतर तेथून नुकतेच परतल्या नंतर,गुरुवार दि.10 ऑक्टोंबर 2024 रोजी कारंजा केन्द्रावर राजयोगाला त्यांनी उपस्थिती दर्शवीली.यावेळी केन्द्रसंचालिका बि.के.मालती बहन यांच्या प्रमुख उपस्थितीत बि.के.डॉ.निखिलभाई कटारीया यांनी गुलाबपुष्प आणि ज्ञानमृत मासिक देवून त्यांचे हार्दिक स्वागत केले.यावेळी संजय कडोळे यांनी आपले अनुभव कथन करीत "ब्रम्हकुमारीज मुख्यालयातील मिडीया कॉन्फरन्स आमच्याकरीता विशेष मार्गदर्शन देवून जाणारी अमृतगंगा ठरल्याचे सांगितले." येथील निसर्गरम्य पर्वतरांगा,वायुमंडल, शुद्ध पाणी,सात्विक आहार आणि शांती,सयंम,प्रेम,पवित्रता पाहून अविस्मरणिय अशा स्वर्ग प्राप्तीची दिव्य अनुभूती आल्याचे सांगताना आज संपूर्ण जगताला ब्रम्हकुमारीज यांच्या आध्यात्मिक शांतीच्या संदेशाची गरज असल्याचे सांगीतले.प्रा. शंकरराव पुंड यांनी देखील माऊंट आबूला जावून दिव्य अनुभूती मिळाल्याचे म्हटले तर से.नि.प्राचार्य यांनी, "ब्रम्हकुमारीज मिडीया कान्फरन्समध्ये जाऊन प्रेम, भाईचारा,आध्यात्मिक ज्ञानाची दिव्य प्रचिती आल्याचे सांगून यांच्या माध्यमातून स्वस्थ आरोग्य व आध्यात्मिक सशक्तीकरण होणे अटळ असल्याचे म्हटले. तर लोमेश चौधरी,विजय खंडार यांनी देखील आपल्याला माऊंट आबू येथे विश्वशांतीचा केन्द्रबिंदू परमात्म्याचा साक्षात्कार अनुभवायला मिळाल्याचे सांगितले. राजयोगिनी ब्र.कु. मालती बहन यांनी "पत्रकार संजय भाई कडोळे हे कारंजा येथील ब्रम्हकुमारीज केन्द्र स्थापने पासून आध्यात्म्याशी जुळलेले असून त्यांची पत्रकारिता सेवाव्रती मार्गाने सुरू असल्याचे सांगून अभिनंदन केले. तसेच इतर पत्रकारांनी देखील ब्रम्हकुमारीज आध्यात्म्य प्रचार प्रसार करून परमात्म्याला जवळ करण्यास सांगीतले. सुत्रसंचलन डॉ.निखिलभाई कटारिया यांनी तर आभार बि. के.प्रदिपभाई वानखडे यांनी केले. यावेळी बि.के. नयना दिदी, बि. के. प्रविण भाई, बि के निखिल भाई,बी. के.रावळे दिदी, बि विल्हेकर दिदी,विश्वनाथ पाटील ताथोड,गजानन चव्हाण व इतरही अनेकांची उपस्थिती होती.