किन्हाळा (मोहटोला) येथे वंदनिय विश्वसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली..
त्यानिमित्ताने ग्रामसफाई करुन पालखी काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. ठलाल ताई कढोली यांचा महाराजांच्या जविन चारित्र्यावर किर्तन, भजन व सर्व मिळून मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्व. विष्णुभाऊ लक्ष्मणजी नाकाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वरश्री सुसंस्कार संगित विद्यालय किन्हाळा (मोहटोला) व गुरुदेव बाल भजन मंडळ किन्हाळा यांच्या तर्फे किन्हाळा येथिल उत्कृष्ट आचारी श्री. केशवजी पारधी, मुखरुजी नारनवरे, देवराज मठ्ठे यांचा शाल, श्रीफळ, व वस्त्रदान देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित मा. नाना भाऊ नाकाडे, मा. परसरामजी टिकले, मा. यादवरावजी ठाकरे, मा. मुखरुजी पत्रे, प्रमोदजी पत्रे, गिरिधरजी दोनाडकर, देवरावजी बावणे, लालाजी मेश्राम, अनिल भागडकर, भाष्करजी मानकर, रेवनाथजी चव्हारे, दुर्वासजी नाईक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये सुत्रसंचालन देवरावजी बगमारे यांनी केले व राजुभाऊ कावळे यांनी सर्वांचे आभार मानले.