कारंजा:- भाजपा युवा नेते ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने मतदार संघातील त्यांनी मागणी केलेल्या कारंजा व मानोरा तालुक्यातील शेत पांदन रस्त्याच्या कामांना महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.मंजुरी देण्यात आलेल्या कामांमध्ये मतदारसंघातील सर्वाधिक शेत पांदण रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी शेतकऱ्यांच्या शेत पांदन रस्त्याची मागणी शासनाकडे केली होती. शेत पांदण रस्त्यांना मंजुरात मिळाल्याने शेतकऱ्यांचे शेत रस्ते मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेत पांदन रस्त्याची दीर्घ काळापासून मागणी होती .शेतात जाण्यास रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पाटणी यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी शेत रस्ते करण्याची मागणी रेटून धरली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघातील काही शेत रस्ते स्वखर्चाने बनविले होते. शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांच्या कामांची मागणी पाटनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या मागणीस यश आले असून शासनाने शासन निर्णय पारित करून शेत रस्त्यांच्या कामास मंजूरात दिली आहे.
सन 2024 या आर्थिक वर्षातील तरतुदीनुसार ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे लेखाशीर्ष 2515 1238 या योजनेअंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विकास कामांना मंजुरी देणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झाला आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज, शासन निर्णय क्र. विकास -2024/प्र. क्र.168/भाग 5/1/योजना 6, बांधकाम भवन मुंबई अन्वये सदर शासन निर्णया सोबतच्या यादीतील कारंजा ,मानोरा तालुक्यातील मंजूर केलेल्या कामांमध्ये खालील शेत रस्त्यांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील दिघी ते मसला पांदन रस्ता करणे,भिलडोंगर ते वार्ड पांदन रस्ता करणे,खांबाळा ते भिलडोंगर पांदन रस्ता करणे, वडगाव व उंबर्डा पांदन रस्ता करणे, तळप ते मानोरा पांदन रस्ता करणे, तोरनाळा अप्पास्वामी संस्थान ते अडाण धरण पांदन रस्ता करणे, इंजोरी ते फततेपूरी पांदन रस्ता बांधकाम करणे,धानोरा ते कारखेडा पांदन रस्ता करणे,शेंदूरजना श्री. ओंकार पाटील यांच्या शेताकडे जाणारा पांदन रस्ता करणे,मौजे वाटोद येथे गट नं ४३ पासून कारंजा रोड पर्यंत पांदन रस्ता करणे,मानोरा तालुक्यातील गव्हा ते मानोरा पांदन रस्ता तयार करणे , मौजे जामदरा कवठळ ता. मानोरा ते मोहगव्हाण शिवाळी पांदन रस्ता बांधकाम करणे,
म्हसणी ता. मानोरा ते धामणगाव शेत पांदन रस्ता बांधकाम करणे,जामदरा ता. मानोरा ते घोटी पांदन रस्ता बांधकाम करणे,
गोवर्धन नगर ते खांबाळा ता. मानोरा पांदन रस्ता बांधकाम करणे,पोहरादेवी ता. मानोरा पोहरादेवी ते धावंडा पांदन रस्ता करणे, धानोरा ते कारखेडा पांदन रस्ता बांधकाम करणे,धानोरा ते वाई पांदन रस्ता बांधकाम करणे,प्रशिक विद्यालय ते विलास विश्वनाथ काळे यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता करणे, युवराज आडे यांच्या शेतापासून ते दुर्योधन चव्हाण शेतापर्यंत पांदन रस्ता करणे, शेंदोना लक्ष्मीबाई मस्के यांचे शेत ते जंगलापर्यंत पांदन रस्ता करणे,आमकिन्ही अकील खान यांच्या शेतापासून ते महादेव रस्त्यापर्यंत पांदन रस्ता करने,भुली ते माहुली पांदन रस्ता करणे,
हातना भुली पांदन रस्ता करणे,शिवणी भुली पांदन रस्ता करणे,
फुलउमरी ते सोमेश्वर नगर पांदन रस्ता करणे, इंजोरी ते दापूरा पांदन रस्ता पांदन रस्ता करणे,जामदरा ते घोटी पांदन रस्ता करणे,
तोरनाळा ते चौसाळा पांदन रस्ता करणे,दापूरा ते भोयणी पांदन रस्ता करणे,आसोला खु. हनुमान मंदिर ते गव्हा रोडवरील सत्यम हेमड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता करणे,गव्हा जय भवानी मंदिर से कृ.उ.बा.स. मानोरा पर्यंत पांदन रस्ता करणे, गोस्ता ते इंगलवाडी पांदन रस्ता करणे,आमदरी ते शिवणी पांदन रस्ता करने, हिवरा खुर्द ते शेंदूरजना पांदन रस्ता करणे, गोस्ता ते इंगलवाडी पांदन रस्ता करणे,वटफळ ते राजना शिवार पांदन रस्ता करणे,आसोला खु. ते गंगापूर ते कारपा पांदन रस्ता करणे. ईत्यादि शेत पांदण रस्ते आहेत.
कारंजा तालुक्यातील अलीमर्दापूर ता. कारंजा गजानन खोडे ते राजु भेंडे शेतापर्यंत पांदन रस्ता करणे,सिरसोली ते लहान धनज पांदन रस्ता बांधकाम करणे, सिरसोली ते रहाटी पांदन रस्ता बांधकाम करणे,सिरसोली ते इसामाय मंदिर परिसरात पांदन रस्ता करणे, धानोरा ते वाई पांदन रस्ता करणे,लोणी ते यावडीं पांदन रस्ता करणे, पसरणी ते गीर्डा पांदन रस्ता करणे,उंबर्डा ते पसरणी पांदन रस्ता करणे, म्हसला ता. कारंजा म्हसला ते धामोरी पांदन रस्ता करणे, म्हसला ता. कारंजा म्हसला ते अकोला पांदन रस्ता करणे, कालीं ते कारंजा पांदन रस्ता बांधकाम करणे, गणेशपुर ते गिर्डा पांदन रस्ता बांधकाम करणे, वाई ता. कारंजा ते चकवा पांदन रस्ता बांधकाम करणे, धनज खु. ते वडुरा पांदन रस्ता बांधकाम करणे, मुरंबी ता. कारंजा जा येथे बाळु मनवर ते नामदेव खेतकर यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता करणे,विळेगाव बेंबळा पांदन रस्ता बांधकाम करणे,गिर्जा फॉरेस्ट ता. कारंजा मधील पांदन रस्ता बांधकाम करणे, तुळजापूर काली माता मंदिर ते यवेतकर शेत पांदन रस्ता करणे, काजळेश्वर ते धानोरा पांदन रस्ता बांधकाम करणे, शहा फाटा ते चांदई पांदन रस्ता बांधकाम करणे, पिंप्री मोखड ता. कारंजा ते हनुमानवाडी पांदन रस्ता करणे, मौजे अनई ते जांब पांदन रस्ता बांधकाम करणे, दादगाव ता. कारंजा दादगाव ते गिर्हा पांदन रस्ता करणे,लाडेगाव ते नारेगाव पांदन रस्ता बांधकाम करने ,लाडेगाव ते इंगईखेड पांदन रस्ता बांधकाम पांदन रस्ता बांधकाम करणे, लाडेगाव ते राजु सातंगे ते दिनेश ठाकरे शेतापर्यंत पांदन रस्ता बांधकाम करणे,बांबर्डा ते जामठी पांदन रस्ता करणे,भामदेवी ते वाढोणा पांदन रस्ता करणे,विळेगाव ते खेर्डा पांदन रस्ता करणे,निबा ते यावाडीं पांदन रस्ता करणे,कार्ली ते कारंजा पांदन रस्ता करणे,
शेवती ते चकवा पांदन रस्ता करणे,रहाटी माळेगाव पांदन रस्ता करणे, रहाटी शिरसोटी पांदन रस्ता करणे. रहाटी रामटेक पांदन रस्ता करणे,उंबर्डा ते पसरणी पांदन रस्ता करणे, गिर्डा ते पसरणी पांदन रस्ता करणे , शेत पांदण रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....