अकोला:- या संस्थेला "ब" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे , मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अकोला येथील जाहीर सभेत" ब" वर्ग दर्जा व विकास आराखडा मंजुरीसाठीआश्वासित केले होते, -- राज राजेश्वर नगरवासीयांचे वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस यांचे आभार मानले,
राज्यातील तीर्थक्षेत्र विकास योजनेखाली घेण्यात येणाऱ्या तीर्थक्षेत्रांचे निकष ठरविण्यासाठी समितीची बैठक मंत्रालयात आज दिनांक 25 जून रोजी घेण्यात आली , या बैठकीमध्ये अकोला शहरातील श्रीक्षेत्र राजेश्वर संस्थान अकोला या तीर्थक्षेत्रास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा झाली असून राज राजेश्वर संस्थांना ब वर्ग देण्याबाबतचा निर्णय आजच्या सभेत निश्चित करण्यात आला , याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल असे आमदार रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले आहे श्री राजराजेश्वर संस्थांनला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याकरिता आमदार रणधीर सावरकर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे , माजी महापौर विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, वसंतजी खंडेलवाल यांनी दिनांक 11 जून रोजी अकोला येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते , श्री राज राजेश्वर संस्थान या तिर्थक्षेत्रविकास व्हावा अशी माजी केंद्रीय राज्य मंत्री संजय भाऊ धोत्रे तसेच स्व. गोवर्धनजी शर्मा अशी मनोकामना पुर्ण होत आहे, पालक मंत्री ना. आकाश जी फुंडकर हे सुद्धा प्रयत्नशील होते, मा. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन श्री राजेश्वर संस्थांना ब वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा देण्यात येईल तसेच संस्थांच्या 50 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल असे जाहीर आश्वासन दिले होते या प्रकरणी आमदार रणधीर सावरकर हे सतत प्रयत्नशील होते, आमदार सावरकर यांनी दिनांक 16 जून रोजी मा. देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून श्री राजराजेश्वर संस्थांना ब वर्ग दर्जा आणि 50 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री महोदयांनी दि. 18 जुन रोजी प्रधान सचिव नगर विकास यांना तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशा सूचना केल्या होत्या , श्री राज राजेश्वर संस्थांच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी दिनांक 23 जून रोजी शासनाच्या नगरविकास विभागाला ५० कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केलेला आहे
श्री राज राजेश्वराच्या पौराणिक व धार्मिक अधिष्ठानामुळे अकोला नगरीला राज राजेश्वर नगरी अशी ओळख आहे. श्रावणमासी श्री राज राजेश्वराची ऐतिहासिक कावड यात्रा सर्वदूर प्रसिद्ध असून लाखो भाविकभक्त या कावड यात्रेत सहभागी होतात. लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राज राजेश्वर संस्थानचा तिर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून विकास व्हावा याकरीता सदर संस्थानच्या प्रथम टप्प्यातील विकास कामांचा सुमारे ५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
सदरच्या विकास आराखड्याअंतर्गत प्रथम टप्यात मंदिराचे सुंदर भव्य स्वागतद्वार, अस्तित्वातील सभागृहाचा विस्तार, सुधारणा व बळकटीकरण तसेच गाभारा व सभामंडप सजावट, पाच मजली भक्तनिवास, प्रसादगृह, पोचमार्ग तसेच रस्ता सुधारणेसह सौंदर्गीकरणाची कामे, प्रदक्षिणा मार्ग, संरक्षण भिंत, स्वच्छता व पेयजल व्यवस्था, दिंडी/प्रवचण/कथा किर्तन याकरीता प्रेक्षक गॅलरी, सौंदर्याकरण व विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही कॅमेरा, वाहनतळ आदी कामांचा विकास आराखड्यात (DPR) समावेश करण्यात आलेला आहे. विकास आराखड्यस लवकरच मान्यता व नीधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री यांना मागणी केली असून अकोला नगर वाशी तसेच लाखो भाविक भक्तांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पुनश्च जाहीर आभार मानले
आपल्या प्रतिक्रिया द्या....