आरमोरी:-विविध स्तरातील विविध घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कोर्सेस चे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.याचा सर्वतोपरी लाभ घेऊन आपली शैशनिक उन्नती करून घ्यावी .याकरिता या करिता यशवंतराव चव्हाण विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व अभासकेंद्राच्या संचालक आणि समन्वयक यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे त्यामुळे या माध्यमातून ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचवा असे आवाहन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य. डॉ. अनिल कुलकर्णी यांनी केले
ते आज दिनांक ०९/०८/२०२२ ला आयोजित विभागीय कार्यालयाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या श्री.किसनराव खोब्रागडे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्ष्य स्थाणावरून बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वित्त समितीचे सभासद तथा अमरावती विभागीय केंद्राचे संचालक मा. प्रा.डॉ.संजय खडतकर ,नागपूर विभागीय केंद्राचे संचालक प्रा.डॉ.सुधाकर इंगळे, विद्यापीठ शिक्षन मंच च्या अधक्ष्या मा. डॉ.कल्पणाताई पांडे ,श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव मा.प्रा.डॉ.सचिनभाऊ खोब्रागडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.डॉ.अनिल कुलकर्णी म्हणाले की आजच्या घडीला सहा लाख विद्यार्थी या माध्यमादवारे शिक्षण घेत आहेत.२०२०राष्ट्रीय शैशनीक धोरण पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाचा सिंहांचा वाटा आहे. प्राध्यापक हे मुक्त विद्यापीठाचे अंम्बेसिडर आहेत .प्रमुख अतिथी स्थनावरून बोलताना मा.प्रा.डॉ.सचिनभाऊ खोब्रागडे म्हणाले की मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा m.p.s.c. च्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे सोबत अभ्यासक्रमाची ऑनलाईन सुविधा ही आहे त्यामुळे सर्व घटकातील विद्यार्थ्यांनी या माध्यमातून आपली शैशनीक उन्नती साधावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागीय केंद्राचे संचालक प्रा.डॉ.सुधाकर इंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.पूनम दुर्योधन केले.तर आभार प्रदर्शन प्रा. अमरदीप मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी श्री.किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरी जिल्हा.गडचिरोली अभ्यासकेंद्र क्र.४३२७A चा सर्व प्राध्यपकानी अथक परिश्रम घेतले.आढावा बैठकीला नागपूर विभाातील सर्व अभ्यासकेंद्राचे संचालक तथा समनव्ययक मोठ्या संख्येने उपस्थित होते.