बार्शिटाकळी : चैत्र नवरात्रोत्सवा निमित्त,श्री.महाकाली देवीच्या गोंधळ जागरणामधून,वंजारीपूरा बार्शिटाकळी येथे,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) जि.वाशिम आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शिटाकळी, कारंजाच्या विद्यमाने,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलावंत संजय कडोळे यांनी उपस्थितांना, "सध्या आपल्या राष्ट्रात लोकशाहीच्या रक्षणाचा मतदानाचा महोत्सव सुरु असून तो मतदान करून सर्वांनी साजरा करावा.अन्नदान,देहदान,नेत्रदान, किंवा रक्तदानापेक्षाही श्रेष्ठ असे मतदान असते.कारण मतदानातून संविधानाने ठरवून दिल्याप्रमाणे,आपल्या स्वराज्याच्या प्रजासत्ताक पंतप्रधानाची स्थापना होत असते. व त्यामधून आपल्याला प्रजासत्ताक लोकशाहीत जगण्याचा अधिकार मिळत असतो.त्यामुळे सर्वांनी येत्या शुक्रवारी दि 26 एप्रिल 2024 रोजी दुपारपूर्वीच मतदान उरकून घेण्याचे" आवाहन केले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात लोककलावंत संजय कडोळे, कमलेश कडोळे,बालकलावंत अथर्व कडोळे,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे बार्शिटाकळीचे तालुकाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध संबळवादक संतोष महाराज सोनोने,सिताराम नागे, गोपाळराव कुळमते,प्रल्हाद पवार,दिनकर मडावी इत्यादी कलावंतानी सहभाग घेऊन, "लेक वाचवा-लेक शिकवा", हुंडा विरोधी, दारुबंदी व व्यसनमुक्ती, मतदान जनजागृतीवर गोंधळगीते सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले.कार्यक्रमाला शेकडो मातृभक्तांनी गर्दी केली होती.असे वृत्त वंजारी समाजाकडून कळविण्यात आले आहे.