गडचिरोली :- गडचिरोली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोदलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना दिनांक 6 आगस्ट शनिवारी पाच वाजताच्या सुमारास घडली .
मारोती पीपटे वय 65 वर्ष रा बोदली ता.जी गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे मारोती पिपरे हे बैल चारायला नेले होते. बोदलीनजीक च्या तलावाच्या परिसरात वाघाने हल्ला केला व त्यांना ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहे. वाघाच्या हल्ल्यात गडचिरोली जिल्ह्यत मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी होत असून याकडे मात्र वनविभाग वारंवार दुर्लक्ष करीत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.