सडक अर्जुनी,:-दिनांक : ०२ मार्च २०२३ :
दी. २६ फेब्रुवारी रोजी वन विभागाने पकडलेल्या त्या ५ आरोपींना सडक अर्जुनी न्यायालया समोर २७ फेब्रुवारी रोजी हजर केले असता मा. न्यायालयाने त्या पाचही आरोपींना ०२ फेब्रुवारी पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. वनविभागाचे अधिकारी घटनेचा कसून तपास करीत आहे. एडवोकेट दीपक बनसोड सह दोघांनी आरोपींची बाजु पाहिली. प्राप्त माहिती नुसार रवींद्र लक्ष्मण बोडगेवार यांच्या घराच्या झडतीत मिळालेले २१ लाख रुपये ही रक्कम त्यांची स्वताची असून त्यांना दारुचे दुकान सुरु करन्या संबंधाने इतरत्र ठिकाणातून गोळा केलेली आहे.
तर यातील आरोपी माणिक दरसू ताराम हा आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याचे सांगितले जात आहे. या आरोपीकडे १ जीवंत मोर व इतर अन्य साहित्य मिळाले आहेत. तो त्यांचा पाळीव मोर अश्ल्याचे समोर आले आहे. तर काळा बिबट गावात कोंबळ्या खाण्यासाठी येत होता. दरम्यान फासात अडकल्याने त्याचा मृत्यु झाल्याची खबर आहे.
सविस्तर वृत्त्त असे आहे की,गोंदिया जिल्ह्यातील चिचगड वनविभाग व पोलिसांनी रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी पालांदूर जमी. येथे झडतीदरम्यान एका आरोपीला अटक करुन वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले होते. दरम्यान त्याच दिवशी रविवारी मंगेझरी येथून आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले आहे.
जिल्ह्यात वन्यप्राण्याच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकार्यांना मिळाली होती. त्या नुसार वनधिकार्यांनी पोलिसांसह रविवार, २६ फेब्रुवारीला संयुक्त कारवाई प्रथम पालांदूर जमी. येथे केली यात रवींद्र लक्ष्मण बोडगेवार यांच्या घराच्या झडतीत वाघाचे नख व दात व अस्वलाचे हृदय तसेच २१ लाख रुपये रोख व ८४ हजार रुपयांची देशी दारु जप्त केली होती.
त्या नंतर मंगेझरी येथे धाड टाकून चार आरोपींना अटक केली. शामलाल विक मडावी, दिवास कोल्हारे, माणिक दरसू ताराम, अशोक गोटे सर्व रा. मांगेझरी अशी आरोपींची नावे आहे. यातील आरोपी माणिक दरसू ताराम हा आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींच्या ताब्यातून वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्यांचे २ दात, १ नख, अस्वलाची ३ नखे, १० रानडुक्कर सुळे, चितळाचे १ शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, १ जीवंत मोर, ५ बंडल मोरपिसे, रानगव्याचे ृ शिंग, जाळे, सुकलेली हाडे, रक्त पापडी ( झाडाची साल ), सुकवलेले मांस हस्तगत करण्यात आले.
पाचही आरोपी विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. तपासात आरोपींनी दुर्मिळ काळा बिबटची शिकार केल्याचेही समोर आले व त्याबाबतचे पुरावे हस्तगत करण्यात आले. दरम्यान, आरोपींकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम दारू विक्रीतील नसून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या व्यवहारातून मिळाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास सुरू असून आणखी काही आरोपी असल्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी वर्तवली आहे. यावर पोलिश अधीक्षक निखील पिंगळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....