कारंजा (लाड) : पावसाळ्यामुळे सर्वत्र वातावरणात बदल जाणवत असून,दमट व सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे,अशा परिस्थितीत साथीचे रोग डोके वर काढण्याची शक्यता असते.सध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यातच रुग्नामध्ये ताप,सर्दी,खोकला,डोकेदुखी, डेंग्यु ,मलेरिया अशी लक्ष्यणे आढळत असून त्यामुळे शासकीय रुग्नालयासोबतच खेडोपाडी प्राथमिक रुग्नालये,आरोग्य वर्धिनी मध्ये रुग्नाची गर्दी होतांना दिसत आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी डबकी साचून त्यामुळे डास व मच्छरांचा प्रकोपही पहायला मिळतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घराजवळ परिसरात डबकी साचणार नाहीत.डास व मच्छरांचा प्रकोप होणार नाही. याची दक्षता घ्यावी.घरात पंखा, मच्छरदाणी,धुळफवारणी असे उपाय करावेत. तसेच महत्वाचे म्हणजे कोणतेही आजार अंगावर न काढता,आपल्या फॅमिली डॉक्टरांची भेट घेऊन उपचार सुरु करावे.असे आवाहन कारंजा येथील समर क्लिनिक तथा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजफ्फर खान आणि डॉ. आमिर खान यांनी केले आहे.