अकोला : घरात अठरा विश्वे दारिद्रय, आई वडिल १००% अशिक्षित, अशा बिकट परिस्थितीत वडील आजी मोलमजूरी करून वेळेवर सिधा आणून उदरनिर्वाह करणारे, घरात अभ्यासाकरीता कोणत्याही सुखसोई नाहीत. ऑनलाईन अभ्यासाला मोबाईल नाही परंतु तशाही परिस्थितीत, ना शिकवणी ना अभ्यास शिकवीणारे आई वडील . तरीपण स्वतःचा अभ्यास स्वतः करीत चि. गजानन प्रमोद गीते याने चिकाटीने अभ्यास करून शालांत परिक्षेत 81% मार्क मिळवून गुणवत्ता प्राप्त केली त्याबद्दल,महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी आज रोजी चि. गजानन प्रमोद गीते याचे त्या मुलाचे घरी गुडदी अकोला येथे जावून भेट देत, पुष्पगुच्छ देवून आणि पेढे वाटून त्याचे अभिनंदन केले आणि पुढील शिक्षणाकरीता मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या .