ब्रम्हपुरी/
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून ब्रम्हपुरी शहरामध्ये 15 ऑगस्ट ला युथ क्लब ब्रम्हपुरीच्या वतीने राजीव गांधी सभागृह ब्रम्हपुरी येथे "एक शाम वतन के नाम" या देशभक्तीपर नृत्य स्पर्धा व गायन सादरीकरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या देशभक्तीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कला-गुणांना वाव देणे तसेच देशाच्या स्वातंत्र्याचा महत्व, इतिहास विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य देवेश कांबळे सर तर सह उदघाटक म्हणून नगर परिषद चे मुख्याधिकारी आर्शिया जुही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जगदीश उर्फ मोंटू पिलारे, वकार खान, भूषण रामटेके, इकबाल भाई जेसानी, अनुकूल शेंडे, डॉ. योगेश बनवाडे, कल्पनाताई गेडाम, प्रियंका कोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर म्हणाले की, आजचे विद्यार्थी उद्याच देशाचं भविष्य असून त्यांना देशाच्या स्वातंत्र्य, देशभक्त स्वातंत्र्य सैनिक यांच्या विषयी माहिती होणे गरजेचे आहे. मुलांमधे राष्ट्रभक्ती बिंबवत असताना त्यांच्या मधील उपजत गुणांना जपणे आवश्यक आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहे. अशा सुदंर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आयोजकांचे कौतुक केले.
या नृत्य स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थी व क्लब ने सहभाग घेतला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग आपल्या कलाकौशल्याचे सुंदर सादरीकरण केले. या स्पर्धेतील समूह नृत्य प्रकारचे प्रथम पारितोषिक ब्रम्हपुरी पब्लिक स्कुल ने पटकविला. द्वितीय पारितोषिक स्टेम पोदार स्कुल ब्रम्हपुरी तर तृतीय पारितोषिक पलक ऍण्ड ग्रुप ने पटकाविला. एकल नृत्य प्रकारामध्ये प्रथम क्रमांक आरोही ठाकरे, द्वितीय क्रमांक निखिल पारधी तर तृतीय क्रमांक अभिज्ञा परकरवार व सांज लोखंडे यांनी संयुक्तपने पटकाविला.
कार्यक्रमात विविध स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्याचे प्रदर्शन करीत सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चंद्रपूर मधील संगीत समूहाने देशभक्तीपर मनमोहक गाण्याचे प्रदर्शन करून वातावरण देशभक्तीमय केला.
कार्यक्रमाचे आयोजन युथ क्लबचे सुरज मेश्राम, शुभम राऊत, अभिजित कोसे, राजेश मेश्राम, भारत मेश्राम, राजेश माटे, पराग सिडाम, राहुल सोनटक्के, आशिष मुळे, डेनी शेंडे, रक्षित रामटेके, उत्पल नागदेवते, सुशांत बनकर, सचिन चौधरी यांनी केले. कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
आपल्या प्रतिक्रिया द्या....