कारंजा : स्थानिक श्री गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच कारंजा शहराचे माजी नगराध्यक्ष, भाजपाचे भिष्माचार्य - जेठूसेठ उपाख्य नरेंद्रजी गोलेच्छा यांच्या वाढदिवसाला दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत कारंज नगरात अक्षरशः त्यांच्या चाहत्यांचा प्रचंड जनसागर उसळल्याचे बघायला मिळाले.याविषयी अधिक वृत्त असे की,लोकनेते भाजपा भिष्माचार्य नरेंद्रंजी गोलेच्छा यांनी जनसंघाचे काळापासून, अनेक वर्षांपूर्वी देशात सत्तेत भाजपा नसताना सुद्धा भाजपाचे प्रामाणिक नेते म्हणून कार्य करीत कारंजा शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हयात भाजपाचे अस्तित्व निर्माण केले होते.नगराध्यक्ष पदावर असतांना कारंजा शहरात सर्वधर्मिय नागरीकांना विश्वासात घेऊन अनेक लोकाभिमुख विकासकामे केलेली होती त्यामुळे त्यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी इतर कुण्या नेत्याला अपवादानेच मिळाली असावी. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता स्थानिक श्री गायत्री माता मंदिरात त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी वाढदिवसानिमित्ताने नरेंद्रजी गोलेच्छा यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांना चाहत्यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू ,बुके,पुष्पगुच्छ देऊन निरोगी उदंड आयुष्याकरिता शुभेच्छा देऊन, "स्वच्छ सूंदर विकसित व शांततामय कारंजा करीता राजकारणात सक्रिय होण्याचा आग्रह धरला.जेठूसेठ त्यांनी नगराध्यक्ष असतांना श्री छत्रपती महाराज पुतळा परिसर/जयस्तंभ चौक /वाल्मीक चौक/बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराचे सौंदर्यीकरण ही कामे कारंजेकर कधीही विसरू शकत नाही. यावेळी सत्काराला उत्तर देतांना, "मी सदैव कारंजेकरांच्या सेवेत आहे व राहील असे सांगून आपला विश्वास व प्रेम हीच माझी कमाई असून त्यांनी सर्वपक्षिय चाहत्यांचे आभार वक्तत केले."