कारंजा : आज वृद्धापकाळ सेवानिवृत्ती योजना,श्रावण बाळ योजना,किसान वेतन योजना आदी चा लाभ घेण्याकरीता आधार कार्ड अत्यावश्यक आहे. आधार कार्ड ची योजना सुरु झाली.तेव्हा जन्माचा खरा पुरावा न घेताच,आधारकार्ड काढण्यात आले.परंतु आता त्यांना आधारकार्ड अपडेट करण्यास सांगण्यात येत असल्याने असे नागरिक ,जन्माचा पुरावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रावर असलेली जन्मतारीख आधार कार्ड (नुतनीकरण)अपडेट करण्याकरीता नेत आहेत.परंतु आधार केन्द्रावर या शाळा सोडण्याच्या पुराव्यावरून आधार अपडेट करून मिळत नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या असून,संबधीत आधार केन्द्राकडून कोतवाल बुकाची नक्कल मागण्यात येत आहे.परंतु 50 वर्षापूर्वी मुलामुलीचे जन्म घरीच व्हायचे. यातही काही नागरिक भटक्या जमातीचे असल्यामुळे त्यांचे आयुष्य गावोगावी भटकंती करण्यामध्ये जात असल्या कारणाने त्यांच्या जन्माची नोंद मिळूच शकत नाही.मात्र या कारणाने त्यांचे आधार अपडेट करून मिळत नसेल तर या नागरिकांनी कोठे जावे ? व काय करावे ? असा प्रश्न पडला असून माननिय तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी या मध्ये काहीतरी मार्ग काढून यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभापासून असा कोणताही नागरिक क्षुल्लक अशा त्रुटीमुळे वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची मागणी,कारंजा तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती संघाचे सचिव तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.महत्वाचे म्हणजे सध्या महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी हा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे व लोकांचे श्रावण बाळ योजनेचे अर्ज मंजूर होत नसतील आणि त्यांचे आधार अपडेट होत नसतील तर या कार्यक्रमाचा उपयोगच काय ? असे सुद्धा संजय कडोळे यांनी म्हटले आहे.