वाशिम - येथील सीबीएसई मान्यताप्राप्त असलेल्या द वर्ल्ड स्कूलच्या सीबीएसई तृतीय बॅच निकाल लागला असून या परिक्षेत स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कु. श्रेय देशमुख ही विद्यार्थीनी ९६.२० टक्के गुण घेवून अव्वल आली असून सततचा सराव, नियमित चाचण्या, तज्ञ शिक्षकांचे प्रयत्न, दररोज एक तास ज्यादा वर्ग, शाळा प्रशासनाची साथ या पंचसूत्रीमुळे शाळेला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया प्राचार्या सौ. भावना एम. सुतवणे यांनी दिली.
या निकालात गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. रोहिनी संबर्गीकर ९४.४०%, कु. साक्षी सिरसाट ९५%, कु. जिज्ञासा वाघ ९३.८०%, कु. चारू बाजड ९३%, सत्यम जाधव ९२.२०%, अविष्कार नायक ८८.८०%, कु. रिया ठाकुर ८८.४०%, सार्थक चोपडे ८८.४०%, नीलेश कावरखे ८६.२०%, कु. गौरी वानखेडे ८५.४०%, कु. दिया जैन ८४.८०%, महेश सोळंके ८४.६०%, कुणाल सिरसाट ८३.८०%, मयूर शिंदे ८२.८०%, सत्यम सिरसाट ८२%, कु. आर्या मालस, सम्यक इंगळे, पृथ्वीराज देशमुख, युगंधर अफूणे, कु. सुमेधा इंगळे, जय इंगळे, हर्षल शिंदे, ओम मालस, सक्षम लाहोटी, गोपाल जाधव, निपुन बोरा, पंकज घोडमोडे या विद्यार्थ्यानी सुयश संपादन केले.
आपल्या प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणी समजून घेऊन शिक्षकांनी केलेले वेळोवेळीचे अमूल्य मार्गदर्शन,त्यांच्यावर असलेला विश्वास, सततची प्रेमळ साथ, शिक्षकवृंदांनी केलेली मेहनत, विद्यार्थ्यांना वेळोवेळी शिक्षक व तज्ञ मार्गदर्शकाकडून केलेले समुपदेशन यामुळे द वर्ल्ड स्कूल ने दिलेला ऐतीहासिक निकाल आणि मिळालेले यश यामुळे सर्व विद्यार्थी,पालकवर्ग, शिक्षकवृंद यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. हा निकाल हा आमच्या इतक्या वर्षांच्या परिश्रमाचे आणि कार्यतत्पर नियोजनाचे हे फळ आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याचा व स्वप्नपूर्तीचा दिवस आहे असे शाळेचे अध्यक्ष सुनील कदम आणि शाळेचे सचिव पंकज बाजड यांनी म्हटले. सर्व शिक्षकांनी अहोरात्र मेहनत करून घेऊन विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. यामध्ये २४ तास पालक आणि शिक्षक लक्ष देऊन होते. सततच्या चाचण्या, वेळोवेळी प्रत्येक विषयात केलेल्या सखोल मार्गदर्शनामुळे हा निकाल पूर्णपणे शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्या परिश्रमाचे फळ आहे असे मत शाळेचे उपप्राचार्य व गणित विभागप्रमुख मनोज सुतवणे यांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सुनील कदम, सचिव पंकज बाजड, प्राचार्य भावना सुतवणे, उपप्राचार्य मनोज सुतवणे. सर्व संचालक मंडळ डॉ. शैलेश जायदे, सचिन जायदे, स्वाती कदम, रीता बाजड, डॉ. राम बाजड, डॉ. अनुराधा सूर्यवंशी, अर्चना आशीष सरकटे, जितेंद्र बोडस, रतन भंगाळे, अनंत बाजड, समन्वयक प्रतिभा मालस, माधुरी गोरे, नारायण ठेंगडे, ज्ञानेश्वर उखळे, निलेश विश्वकर्मा, भारत गायकवाड, नारायण सोळंके, प्रशांत शेळके, गजानन ठाकरे, प्रवीण डोंगरदिवे, सारिका मगर, मेघा जाधव, पूजा राऊत, शितल तिवारी, स्वप्ना सूर्यवंशी, नूतन कव्हर, मेघा जाधव, श्रद्धा काटकर, मनीषा शेळके, पायल खाडे, अक्षिता किडसे, रेणुका साबळे, नेहा जोशी, आदिती गोरे, दीक्षा आगरकर, मोनाली भुसारी, पल्लवी जोशी, रोहिणी पवार, किरण वैद्य, सुरेखा झामरे, गायत्री तर्हाळकर, मीनल सुर्वे, पूनम बुंधे, भाग्यश्री वाणी, मंदा इंगळे, सुरेखा पट्टेबहादूर, वैशाली वाघमारे, अर्चना देवगिरकर, जयश्री कडुकर, सविता रत्नपारखी, संध्या घुगे, दुर्गाप्रसाद अंभोरे, मंगेश खानबरड, बंडू इंगोले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....