कारंजा (लाड) :दि 28/10/22 रोजी कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथील शिवराम इंगळे व त्यांच्या पत्नी इंदुबाई इंगळे हे वयोवृद्ध पती पत्नी श्रावण बाळ निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी कारंजा येथे आले होते. बँकेतून पैसे काढून ते परत ऑटोने परत आपल्या दिघी या गावी जात असताना, दारव्हा रोडवरील, समतानगर येथील दर्ग्या जवळून गावी जात असतांना अचानक ऑटोचालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्यामुळे, भीषण अपघात झाला. त्यामुळे शिवराम इंगळे वय 72 रा दिघी हे वृद्ध जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी सौ इंदुबाई इंगळे वय 55 या गंभीर जखमी झाल्या . जखमीची माहिती कबड्डी प्लेयर आदेश राऊत पाटील यांनी तात्काळ श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली असता त्यांनी तात्काळ आपली रुग्णवाहिका अपघात स्थळी आणून जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ . आडे यांनी शिवराम इंगळे यांना मृत घोषित केले व इंदुबाई यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. तसेच याप्रसंगी मातोश्री रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक विधाता चव्हाण व रुग्णसेवक प्रसन्ना काळबांडे हे आपली रुग्णवाहिका घेऊन यवतमाळ वरून कारंजासाठी येत असताना वाटेमध्ये त्यांना अपघात दिसताच त्यांनी सुद्धा आपली रुग्णवाहिका थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली .
विशेष म्हणजे सदर रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण असताना सुद्धा त्यांनी अपघात झालेल्या रुग्णांची मदत केली. असे वृत्त प्राप्त झाले आहे. तसेच कारंजा ते सोमठाणा मार्गे दिघी जाण्या करीता महामंडळाच्या बसची व्यवस्था नसल्यामुळे आपला जीव धोक्यात टाकून या गावच्या नागरिकांना प्रवासाकरिता ऑटो या खाजगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे कळते .