कारंजा (लाड) : श्री क्षेत्र कारंजा येथे श्री.नृसिंह सरस्वती स्वामी संस्थान येथे (श्री गुरु मंदिरात) कारंजा येथे परमपूज्य परमहंस श्री संत परशराम महाराज,यांच्या श्री परशराम महिमा या ग्रंथाचे ,दि 9 जुलै 2023 रोजी,भव्य असे सामुहिक पारायण होणार आहे. तरी परमहंस श्री संत परशराम महाराजाच्या भाविक भक्त मंडळीनी,पारायणाकरीता दि . 30 जून पूर्वी आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन परमहंस श्री संत परशराम महाराज सेवाधारी परिवार यांच्या कडून करण्यात आले आहे.सुमारे 123 वर्षापुर्वी 14 मे 1900 रोजी जैतापुर ता. भातकुली जि. अमरावती या खेडेगावात शिवशंकर परमात्म्याने,परमहंस श्री संत परशराम महाराजांनी, परशराम नावाने मानवीरूपाने, आई,भीमाबाई बळीरामपंत (गुरव) वडनेरकर व वडिल बळीरामपंत (गुरव) वडनेरकर यांच्या पोटी,जळतापुर जिल्हा अमरावती येथे जन्म घेतला. जन्मापासून त्यांनी आपल्या अद्भुत बाललीलाद्वारे दिव्यत्वाची प्रचिती करून दिल्याने,ते अवतारी पुरुष म्हणून ओळखले जावू लागले.

परमहंस श्री संत परशराम महाराजांनी सुमारे 51 वर्षे कित्येक लिला,साक्षात्कार,महिमा करून भक्तांचे कल्याण केले.परशराम महिमा ग्रंथात याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यांच्या ह्या परशराम महिमा ग्रंथ पारायणाने ०९ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक भाविकांनी पारायणासाठी ३० जुन पूर्वी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री परशराम महाराज सेवाधारी परिवार यांची तर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच परमहंस श्री संत परशराम महाराज हे कारंजा पंचक्रोशीत कारंजा तालुक्यातील इंझा (वनश्री ) या छोट्याशा खेडेगावामध्ये दि . 21 मार्च 1951 रोजी (होळी पौर्णिमेच्या) दिवशी ब्रह्मलीन झाले. भाविक मंडळीनी इंझा (वनश्री) येथे त्यांचे संजिवन समाधी मंदिर स्थापन केले असून, या मंदिरात भाविकांना आजही श्री परशराम महाराज यांची प्रचिती, अनुभूती व साक्षात्कार दिसून येत असतात. दरवर्षी येथे त्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी होत असतात. आजमितीला ठिकठिकाणी महाराजांच्या श्री परशराम महिमा ग्रंथाचे पारायण होत असतात परंतु कारंजा परिसरामध्ये अद्याप महाराजांचा कुठलाही पारायणाचा कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे प्रथमच कारंजा येथे पारायणाचा कार्यक्रम आयोजीला आहे तरी सर्व समाज बांधवांनी व भाविक भक्तांनी या पारायण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे या हेतूने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज ( श्री गुरु मंदिर) मंदिराचे विश्वस्त कारंजा (लाड) यांच्या सहकार्याने थेट मंदिर परिसरातील समोरच्या सभागृहात पारायणाची संधी भाविकांना मिळणार आहे. तरी इच्छुक भाविकांनी अधिक माहितीसाठी ,सेवाधारी देविदासजी वाघमारे,जयंत वानखडे,गोकुळभाऊ शेगोकर, भालचंद्र दादा पाटील कथलकर, राजूभाऊ काथलकर, प्रशांतभाऊ देशमुख, अध्यक्ष शरद देवरणकर, जयंत पुसदकर, विलास जामठीकर, विलास दलाल, शरद निहाटकर, हरिहर तांबस्कर, संदीप राजूरकर, सचिन आरोकर, राजू धाकतोड,गणेशराव भांडे,सचीनराव चौधरी, दत्ताभाऊ कापसे,दिपक राजनकर,संतोष दुत्तोंडे,अशोक आगरकर, शुभम पुसतकर,ओम मोरे, कैलास डांगे, सुरेश रोहनकर, मोहन पंडित, पुरुषोत्तम खंडार, सौ रंजनाताई डोरस, सौ पद्माताई भारसाकळे, प्रभाकरराव शेगोकर, चंद्रकांत पुसदकर, अंकुश बाळापुरे, विजय , संजय कडोळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....