चंद्रपूर जिल्ह्यातील १ एप्रिल २०१५ ला सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दारूबंदी करण्यात आली. मात्र दारू बंदीच्या नावावर जिल्ह्यांतील तसेच अनेक ठिकाणी विशेषतः ब्रम्हपुरी तालुक्यात दारूचा अवैध महापूर वाहत होते. यामुळे पालक मंत्राच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केल्या जात होत्या. याबाबत विविध माध्यमातुन शासनावर व प्रशासनावर
ताशेरे उडविण्यात आले.
मात्र राज्यातील सरकार बदलली तेव्हां सुद्धा जिल्हयात दारू बंदीचा सत्तेतील काही महाशयांनी खूप मोठा फायदा घेत सर्व नियम धाब्यावर ठेवून सर्रास पने अवैध दारु विक्री व सप्लाय चे काम सुरू केले.
मात्र यावर सुद्धा लोकांनी आवाज उठवले
आणि जिल्ह्यात दारू बंदी उठवुन दारू सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारू बंदी उठवली.
मात्र यावर सुद्धा शंका उपस्थित करून वामनराव चटप व अभय बंग यांनी व विविध मध्यमातून लोकांनीं विरोध दर्शविला.
वामनराव चटप व अभय बंग यांचा दारूला असलेल्या विरोधाचे पूढे काय झाले त्यांनाच ठाऊक. तर दारू बंदीचा असलेला सूर गायप झाल्याने या मान्यवरांच्या हस्तक्षेपावर लोकांनी प्रश्न निर्माण केले.
२७ मे पासुन चंद्रपूर जिल्हयातील दारु सुरु करण्यात आली त्यामधे देशी दारूची दुकाने , बियर बार व बियर शॉपीची दारू दुकाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र दारु सुरु करुन सुद्धा अवैध दारू तस्करी व विक्री थांबली नाही.
तर कमी वेळेत जास्त पैसा कमविण्यासाठी वैद्य व्यवसाय म्हणून ब्रम्हपुरी शहरांतील गल्लो गल्लीत बियर शॉपीची दुकाने लागल्याने या बियर शॉपीच्या दुकानाला किराणा दुकाना दुकानाचे स्वरूप आले असून शहरातील बियर पिणाऱ्या शाळेकरी , अल्प वयाच्या मुलांनाही बियर मिळत असल्याने
अल्पवयीन मुले सुद्धा आता या शॉपीच्या दुकानात मोठ्या संख्येने
पाहायला मिळत असून बियर शॉपीची दुकानांना आता विषेश महत्त्व आले आहे.