अकोला : - मराठा सेवा संघाचे कार्य अधिक गतिशिल करणे व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी केंद्रिय कार्यकारिणीने सूचना केल्याप्रमाणे मराठा सेवा संघ व इतर कक्षाच्या पुनर्बांधणीसाठी मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीने नियुक्त केलेल्या समितीची बैठक दिनांक ६ जुलै २०२५ ( रविवार )रोजी सकाळी ११-०० वाजता मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालय जिजाऊ सांस्कृतिक भवन छत्रपती संभाजी महाराज मार्ग,जूने आर.टी.ओ.ऑफीस जवळ अकोला येथे निवड समिती प्रमुख मा. इंजि अरविंदराव गावंडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष मा. सीमाताई बोके,मराठा सेवा संघाचे केंद्रीय कोषाध्यक्ष मा अशोकराव पटोकार, विभागीय अध्यक्ष तथा निवड समिती सदस्य मा. अशोकराव महाले, मा. शिवाजीराव ढोकर पाटील , जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रशांतजी जानोळकर निवड समिती सदस्या शिवमती ज्योतीताई कोथळकर, शिवमती सुनीताताई जिचकार, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी केंद्रिय कोषाध्यक्ष इंदूताई देशमुख,जिल्हाध्यक्ष रेणूताई गावंडे,विचार पिठावर विराजमान होते .सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हरार्पण केले.कु . सोयरा अंधारे हिने जिजाऊ वंदना सादर केली.विचारमंचावरील उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले त्यानतंर सभेला रितसर सुरवात झाली. जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रशांत जानोळकर यांनी प्रस्ताविक केले. सभेला उपस्थित सर्व समीती सदस्यांनी सभेसबंधी आपली विस्तृत भुमिका सांगितली निवड समिती प्रमुख व सभाध्यक्ष मा इंजि. अरविंदराव गावंडे साहेब यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करून मराठा सेवा संघ व इतर कक्षा मधील राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीवर कार्य करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी आपले अर्ज निवड समितीकडे सादर करावेत असे आवाहन केले त्यानतंर प्राप्त झालेले अर्ज सभेसमोर वाचून दाखविले व केंद्रीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया राबवून सर्वानुमते मराठा सेवा संघ अकोला च्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. रणजीत कोरडे यांची सर्वानुमते निवड झाल्याचे घोषीत केले व उर्वरीत जिल्हा कार्यकारिणी प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वानुमते निवडण्याचे अधिकार नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना बहाल केले सभेचे सूत्रसंचालन शिवश्री प्रशांत बुले यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष विजयराव ताले यांनी केले.सदर बैठकीस जिल्हयातील मराठा सेवा संघ व सर्व कक्षाचे आजी - माजी पदाधिकारी, आजीव सदस्य,कार्यकर्ते, समाज बांधव - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.दिलीप देशमुख
कार्यालयीन सचिव मराठा सेवा संघ, अकोला जिल्हा. यांनी कळविले