येत्या काळामध्ये वातावरणातील वाढत्या तापमानामुळे व बदलांमुळे मानवी जनजीवनावर तसेच निसर्गात वेगवेगळे हानिकारक परिणाम होताना दिसून येत आहेत .अशा येणाऱ्या आपत्ती मध्ये प्रत्येकाने आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन येणाऱ्या काळात पर्यावरणाशी आपले नाते घट्ट करण्याच्या हेतूने मानवी जीवनात वाढत्या वयामध्ये म्हणजेच वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन परमेश्वर व्यवहारे यांनी केले .
दि. 9-6-24 रोजी स्मशानभूमी बायपास कारंजा या ठिकाणी नियमित चाललेल्या वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते . निमित्य होते श्री अशोक सार्वे व हरणें साहेब यांच्या वाढदिवसाचे . श्री सार्वे साहेब दरवर्षी 150-200 बेलाची रोपेतयार करून वितरित करीत असतात. तसेच हे दोघेही दर रविवारी स्मशानभूमीत नियमित श्रमदान करीत असतात. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. यावेळीं वैकुंठ सेवाधारी चंद्रेश पटेल, गजानन राऊत, अशोकराव सर्वे, परमेश्वर व्यवहारे, श्री हरणे, श्री.धाढवे सर , सर्वधर्म मित्रमंडळाचे श्याम सवाई, स्मशानभूमीचे ओम शिंदे महाराज यांची उपस्थिती होती.
येत्या काळामध्ये वृक्षाचेरोपण होऊन त्याचे संगोपन व्हावे जेणेकरून येत्या काळातील उष्मालाट, वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या घटनांना काही प्रमाणात प्रतिबंध करण्याकरिता तसेच सामान्य माणसांच्या वेदना कमी करण्याकरिता याची मदत होईल ,त्याकरिता जिथे जागा असेल तिथे झाडे लावावीत. ज्या परिसरामध्ये जागा नसेल अशा वेळेस सार्वजनिक ठिकाणी ,शाळा ,अंगणवाडी रुग्णालय, स्मशानभूमी व रस्त्यांच्या दोन्ही बाजूने झाड लावावीत, असे आव्हान श्याम सवाई यांनी केले
वैकुंठ सेवा परिवार अनेक महिन्यांपासून दर रविवारी कारंजा स्मशानभूमी साफसफाई नित्यनेमाने करीत आहे. गजानन भाऊ नाखले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा अभियान श्रमदान साफसफाई ते वृक्षारोपण, वृक्ष संगोपन इत्यादी सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत , आठवड्याच्या दर रविवारी सकाळी 6:30 ते 7:30 या कालावधीमध्ये आपल्या आपल्या परीने येऊन वैकुंठ सेवाधारी श्रमदान करत आहेत.