वाशिम. (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :- महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार प्राप्त,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थीच्या,अकोला येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ति पुरस्कारार्थी संघटनेची सभा सोमवार दि.28 आँगष्ट 2023 रोजी दुपारी ठिक 01:00 वाजता,शिक्षक भवन,पाण्याच्या टाकीजवळ,रेल्वे स्टेशन,अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभे मध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.तरी या सभेला अकोला,अमरावती,वाशिम, बुलढाणा,तसेच यवतमाळ मधील सर्व पुरस्कार्थी बांधवांनी या सभेला वेळेवर हजर राहावे.असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अशोक रामटेके,प्रदेश उपाध्यक्ष राम शगोकर सर यांनी केले असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आल्याची माहीती वाशिम जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी संजय कडोळे यांनी दिली आहे.