वाशिम : बालविवाह हा सामाजिक आरोग्यास अपायकारक आहे, बालविवाहामुळे माता बाल आरोग्याचे गंभीर प्रश्न उदभवतात. बालविवाह घडवुण आणणारे, त्याला चालना देणारे, उदिम उदा. मंगल कार्यालये/पुरोहित (सर्वधर्मिय) /फोटोग्राफर्स व्हिडीओ ग्राफर्स/कॅटरर्स/मंडप डेकोरेटरर्स/लाईट आणि बँड व डिजे साउंड सर्विस तसेच संबंधित व्यवसायी इ. देखील अशा यांच्या कृतीमुळे सामाजिक आरोग्यास घातक ठरू शकतात. परिणामी समाजाच्या आरोग्याला किंवा शरीर स्वास्थ्याला अपायकारक असणा-या बाल विवाह करण्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता बालविवाहास चालना देणा-या व्यवसाय-उदिमांना मनाई व विनीयमन करण्याची खात्री झाल्याने हा सार्वजनिक उपद्रव दुर करण्यासाठी आदेश देण्याचे प्रयोजित केले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, वाशिम फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३३(१)(ख) व १३३ (१) (२) अन्वये वाशिम उपविभागातील संपुर्ण कार्यक्षेत्रात बालविवाह रोखण्यासाठी आपआपल्या कार्यक्षेत्रात येणा-या कार्यालये,पुरोहित,फोटोग्राफर्स, व्हिडीओ ग्राफर्स,कॅटरर्स,मंडप डेकोरेटरर्स,लाईट, बँड व डिजे साउंड सर्विसेस तसेच संबंधित व्यवसायीक यांना बालविवाह समारंभामध्ये व्यवसाय सेवा देण्यास मनाई करण्यात येत आहे. व्यवसायीकांनी कोणत्याही विवाह समारंभात सेवा देण्यापुर्वी सदर विवाह हा बालविवाह नसल्याची खातरजमा करणे आवश्यक राहील. यासाठी व्यवसायीकांनी ज्या विवाह संमारंभात सेवा देणार आहेत, तेथील विवाहोच्छुक वधु-वरांची माहिती आधार कार्ड,जन्मदाखला किंवा दोन्हीच्या स्वसाक्षांकित प्रती व फोटोसहीत त्यांचे स्वतंत्र नोंदवहीत नावे नोंदवावी. आधार कार्ड वरील जन्मतारखेवरून विवाहोच्छुक वुध-वरांचे वय कायदयाप्रमाणे योग्य असल्याची पडताळणी करावी. अशी पडताळणी न करता बालविवाहाच्या समारंभात सेवा दिल्यास अशी कृती ही बालविवाहास चालना देणारी किंवा सामाजिक आरोग्यास घातक कृती समजल्या जाईल. व सदर आदेशान्वये योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील. स्थानिक ग्रामपंचायतीने त्यांचे कार्यक्षेत्र व आसपासच्या गावातील असे व्यवसाय उदिम करणा-या व्यक्ती व संस्थांची यादी त्यांचे संपर्क क्रमांक व अनुषंगिक माहिती स्वतंत्र नोंदवहीत नोंदवून जतन करावी. विवाह समारंभाशी संबंधित व्यवसायीकांकडील नोंदवहया व ग्रामपंचायतीकडील नोंदवहया तपासण्याचा व त्यातील माहिती वापरण्याचा अधिकार संबंधित कार्यक्षेत्रातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व ग्राम / नगर स्तरीय बालसंरक्षण समितीस असेल. त्यावरून यासमितीस किंवा अधिका-यास बालविवाहाबदल अवगत झाल्यास बालविवाहास चालना देणा-या विरूध्द बालविवाह प्रतिबंधक अधिनीयम २००६ अन्वये कलम ९,१० आणि ११ अन्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३३ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कार्यवाही करणे बाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी वैशाली देवकर यांनी पारित केला आहे.