कारंजा लाड --विदर्भ लोक कलावंत संघटना, ज्ञानगंगा साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र संजय भाऊ कडोळे यांचा आज वाढदिवस
संजय भाऊ सामाजिक चळवळीतुन आलेलं एक युवा नेतृत्व, संघर्षाची किनार लाभलेले संजयभाऊ दिव्यांग असुनही ज्या पध्दतीने सामाजिक कार्याला स्वतःला वाहुन घेतले ते खरोखरच आजच्या काळात युवकाला लाजविणारे आहे, स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणविणारे फक्त फेसबुक व वाॅट्सअपवरच असतात. पण संजयभाऊ याला अपवाद ठरले. प्रत्यक्षात जमिनीवर राहुन पायी चालत समाज व शहराच्या विकासासाठी सतत झटत असतात.
याचा साक्षीदार स्वतः मी आहे.संजयभाऊंचे मित्रत्वाच्या नात्याने मला सतत फोन असतात. संदेशभाऊ तुम्ही कॉग्रेसचे पदाधिकारी आहात. शहरात भरपूर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी काँग्रेस च्या माध्यमातून काही तरी करा त्यांची ही तळमळ बघुन असं वाटतं की अशा व्यक्तिमत्त्वाने आणखी खुप मोठं व्हावं.
क्षेत्र कोणतेही असो मग ते सामाजिक असो वा साहित्यिक,शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रातील विविध समस्यांवर वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करीत असतात. सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी जिव्हाळ्याचे संबंध असुनही स्वतः चा स्वार्थ कधीं पाहिला नाही,स्वार्थ बघितला तो केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेसाठी
असे सुसंस्कृत व सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले धडाडी चे सामाजिक कार्यकर्ते झुंजार पत्रकार माझे मित्र संजय भाऊ कडोळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व भविष्यातील भावी सामाजिक कार्यासाठी निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !