वाशिम : गेल्या पाच वर्षापासून, सर्वच शासकिय निमशासकिय समित्यांचे गठनच झाले नसल्यामुळे,वयोवृद्ध, दिव्यांग व गरजू लोक कलाकारांना मानधन मंजूर करणाऱ्या,जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील लोकसहभाग असणारी, "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती" सुद्धा स्थापन होऊ शकलेली नाही.परिणामी जिल्ह्यातील हजारो शाहीर, किर्तनकार,व्याख्याते,गायक, भारूडकार,गोंधळी,भजनीमंडळ कलावंत,वाद्य,नृत्य कलावंत इत्यादी लोककलावंताचे मानधनाचे प्रस्ताव धुळ खात पडलेले असून,हजारो लोककलावंत "शासनाच्या सांस्कृतिक मानधन योजने वाचून वंचित राहीलेले आहेत.शिवाय त्यापैकी कित्येक वयोवृद्ध कलावंताचे मृत्यु झाल्याचेही वास्तव आहे.वयोवृद्ध लोक कलाकाराच्या समस्या निकाली लागून त्यांना त्यांचे न्यायहक्काचे मानधन मिळून त्यांची वृद्धापकाळी उदरनिर्वाहाची व औषधोपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून जिल्ह्यातील "विदर्भ लोककलावंत संघटना व इतर संघटनानी" गेल्या पाच वर्षात अनेक वेळा उपोषण,धरणे आंदोलने केलीत.परंतु जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार व पालकमंत्री महोदयांनी केव्हाच कलावंताच्या भावनांना मनावर घेतले नाही.व त्यांच्या मागण्याची पूर्तता केली नाही. आज प्रजासत्ताक लोकशाही असतांनाही जिल्ह्यातील लोककलाकार शासकीय मानधनाच्या योजनांपासून वंचित राहीले आहेत.त्यामुळे आपला संताप व्यक्त करतांना विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले की, "एखादेवेळी दगडालाही पाझर फुटला असता परंतु स्थानिक सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री यांना लोककलावंताची कोणतीही दयामाया येत नाही.ही दुदैवाची गोष्ट असून याचे आम्हाला शल्य आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि पालकमंत्री स्वतःची सत्ता भोगण्यातच मश्गुल झालेले दिसतात.आणि त्यामुळे लोककलावंत यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधी व आमदार यांना आगामी सार्वत्रिक निवडणूकीत आम्ही धडा शिकविणारच.आमचे कोणतेच शाहिर,किर्तनकार,व्याख्याते, गायक निवडणूकी मध्ये लोकप्रतिनिधी व राजकिय नेते यांना मदत करणार नाहीत. शिवाय एकमताने आम्ही, "आगामी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ किंवा एकही उमेद्वार लायक नाही म्हणून उमेद्वार नापसंत असा शेवटचा पर्याय वापरू." असे स्पष्ट शब्दात संजय कडोळे यांनी बजावले आहे.त्यामुळे आतातरी जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री लोककलावंताच्या मागण्याचे गांभीर्य ओळखणार काय हे पहावे लागणार आहे.