कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दिनांक 10 जुलै 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांनी कारंजा तालुक्यातील पसरणी ,वडगाव ईजारा ,धामणी इत्यादी गावां करीता मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजपा जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे तर सर्व कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सर्वश्री भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकिरड, पं. स. सदस्य दिनेश वाडेकर, वाघोळा येथील सरपंच अरुण ठोंबरे प्रामुख्याने होते.पसरणी येथे गुरुभारती महाराज समाज मंदिर परिसरात समाज मंडपाचे बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे, अल्पसंख्यांक निधीतून शादी खाना बांधकाम करणे 15 लक्ष रुपये या कामाचे,2515 अंतर्गत पसरणी येथे स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे या कामाचे, आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्थानीक विकास निधीतून पसरणी ते सोहळ रस्त्यावर सीडी वर्क बांधकाम करणे अंदाजीत किंमत दहा लाख रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी व्यापीठावर गावातील सर्वश्री किशोर नेमाने, चांद गारवे सरपंच, बाळू बरडे,बबन पाटील नेमाने, विनायकराव नेमाने,चंद्रकांत नेमाने, महेबुब चौधरी, भागवत खुरपे, राजु पवार, दिलीप नानोटे, बबन बरडे, गजानन नेमाने , रमजान गारवे, भीमराव पवार, दिनकर नेमाने, रितेश खानबरड, विष्णु पाटिल नेमाने, मोतीराम चोरपगार, सुधाकर चकदळ, चंद्रशेखर नेमाने इत्यादीसह कार्यक्रमात गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. वडगाव ईजारा येथे 2515 अंतर्गत विलास गरड ते उकंडा जेमा यांच्या घरापर्यंत पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत वडगाव ई. ता.कारंजा येथे बौद्ध विहार दलित वस्तीमध्ये सभा मंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.येथे व्यासपीठावर गावातील सर्वश्री देवानंद राठोड, सर्वश्री तुकाराम महाराज, तारासिंग महाराज, मोहन महाराज,संजय जाधव, गायकवाड सरपंच, चंदु जाधव, रमेश राठोड, पुंडलिक राठोड महाराज, बाळू पठाडे, प्रकाश पठाडे, सुधीर जाधव, दुर्योधन जाधव, अशोक पाटिल खानबरड ,अविनाश जाधव, बंशीराम जाधव, सुभाष पवार, बिरजू महाराज, प्रविण गावंडे इत्यादिसह गावातील नागरिक उपस्थित होते.धामणी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून शादी खाना लोकार्पण अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे,राज्यस्तरीय दलित वस्ती निधीतून सभामंडप बांधकाम करणे अंदाजे किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे 2515 - 1238 अंतर्गत नर्मदेश्वर मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे,जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामाचे अंदाजीत किंमत 1 कोटी 12 लक्ष रुपये (नळ कनेक्शन पाईपलाईन व पाण्याची टाकी बांधकाम करणे) या कामाचे,दलित वस्तीत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे अंदाजित किंमत 8 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

येथे व्यास पिठावर सर्वश्री सरपंच नितीन चक्रे, उपसरपंच गजानन दहापुते, एम.टी.खान,राहुल उजवने, किशोर खोंड, अमोल जाधव, गोपाल सुडके, मंगेश नेतनकर, नितीन ढेंबरे, महादेव खडसे, महादेव पिंगाने, मनोहर जामुदे, नंदु घाटे, काशिनाथ राऊत, प्रकाश घाटे, देवराव नेतनकर, प्रल्हाद चव्हाण, नईम खान,संजय लहानकर, तुळशीराम घाटे, बाळू भाऊ सारसकर, ज्ञानेश्वर नेतनकर,गणेश उजवणे, नंदु भाग्यवंत इत्यादी सह कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धामणी येथील कार्यक्रमाचे संचलन मसने यांनी केले प्रास्ताविक दिनेश वाडेकर यांनी केले.कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य आणि धामणी पसरणी वडगाव येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. असे संजय भेंडे भाजपा ता. प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....