ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल आंदोलनाची 30सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर (दिनांक 29 सप्टेंबर )ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले. उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नाही म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याच्या व ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम ठरविण्यातच्या दृष्टीकोनातून रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ला दुपारी 1 वाजता मातोश्री सभागृह , तुकुम येथे बैठकीचे आयोजन केले आहे उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रिय ओबीसी महासंघ यांनी केले आहे.