कारंजा (लाड) : दिवंगत माजी मंत्री तथा कारंजा मतदार संघाचे माजी आमदार स्व.बाबासाहेब धाबेकर यांनी आपल्या कारकिर्दीत खऱ्या अर्थाने कारंजा विधानसभा मतदार संघाचा पुरेपूर विकास केलेला होता. शेतकऱ्याचा शेतमाल विक्री करीता थेट कारंजा बाजार पेठेत आणता यावा यासाठी सर्वप्रथम त्यांच्या कारकिर्दीतच कारंजा तालुक्यातील ग्रामिण भागात रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरण होऊन,प्रत्येक खेडे कारंजा बाजार पेठेशी जोडल्या गेले होते. त्याशिवाय कारंजा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्या करीता त्यांनी थेट अडाण धरणा मध्ये पाईप लाईन टाकून, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण द्वारे पिण्याचे पाणी कारंजा वासियांना उपलब्ध करून दिले. स्व. बाबासाहेब धाबेकर स्वतः जातीने तळागाळातील,ग्रामिण भागातील आणि विशेषतः सर्वधर्मिय जनतेच्या समस्या सोडविण्या साठी प्रयत्नशिल व कार्यरत रहायचे.अधिकारी वर्गावर त्यांचा वचक असायचा.त्यामुळे अधिकारी सामान्य जनतेच्या अडचणी लगेच सोडवायचे. त्यांच्या कारकिर्दीत शेतकरी राजा व सर्वसामान्य आनंदात असायचे. असे गतवैभव परत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला मिळवून देण्याकरीता, जनसामान्यांनी स्व. बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनिल पाटील धाबेकर यांना आग्रह धरला असून,सुनिल पाटील धाबेकर यांनी देखील आपली उमेद्वारी बळकट करण्याकरीता गेल्या दहा वर्षापासून कारंजा तालुक्याची निवड आपली कर्मभूमी म्हणून केलेली आहे. बाबाबाहेब धाबेकर सभागृह, फॉरेस्ट गार्डन जवळ कारंजा येथे सुनिल पाटील धाबेकर यांचे जनसंपर्क कार्यालय असून सातत्याने ते मतदार संघातील समस्या सोडवीत आहेत.शिवाय त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असून दररोज खेडोपाडी जाऊन ते आपला जनसंपर्क वाढवीत आहेत. भविष्यात सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांच्या रुपाने कारंजा मानोरा मतदार संघाला त्यांच्या रुपाने आमदार मिळाला तर मतदार संघाचा आणि सर्वधर्मिय हिंदु मुस्लिम बांधवाचा विकास झाल्या शिवाय रहाणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचा विश्वास त्यांचे निकटवर्ती कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदिप वानखडे यांनी म्हटले आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.