कारंजा (लाड) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, गुरुवार दि.५जून २०२५ रोजी ठीक सकाळी ०८:०० वाजता,स्थानिक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केन्द्र कारंजा येथे जागतिक वृक्ष पर्यावरण दिनानिमित्त,राजयोगिनी बीके मालती दीदी यांच्या हस्ते वड, पिंपळ,कडूलिंब आदी प्राणवायूयुक्त वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बी के परिवारातील बीके नयना दीदी,बीके रीना बहन,बीके मंदाताई,बीके लताताई,बीके छायाताई बीके सुमनताई,बीके साधनाताई,बीके रंजनाताई, बीके उमाताई,बीके प्रदिप भाई,बीके प्रवीण भाई, बीके डॉ.निखिल भाई,बीके साखरकर भाई,बीके बारड भाई आणि इतर बीके परिवारातील जास्तीत जास्त भाई बहन उपस्थित होते.यावेळी राजयोगिनी बीके मालती दिदी यांनी, 'पर्यावरणाचा समतोल राखण्या साठी आणि मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी सृष्टिमध्ये जास्तित जास्त प्राणवायूची ( ऑक्सिजनची ) आवश्यकता असून,निसर्गातील वृक्षवेली जगले तरच प्राणवायू मिळेल त्यामुळे प्रत्येक बीके भाई बहन यांनी जेथे जागा मिळेल तेथे वड-पिंपळ-औदुंबर कडूलिंब इ झाडांचे वृक्षारोपण करावे. आणि महत्वाचे म्हणजे जी झाडे उपलब्ध आहेत . त्यांना आवश्यक असणारे खत पाणी देवून झाडांचे संवर्धन करावे." असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.