वाशीम : अष्टविनायकामधील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र रांजनगाव महागणपती येथे संस्थानचे उपाध्यक्ष संदीप दोडकर यांच्या हस्ते संस्थानच्या वतीने कार्यालयात दि. 28 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेश पुनमचंद सोमानी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना संस्थानकडून आशीर्वादरुपी दुपट्टा,श्रीफळ,महागणपतीची प्रतिमा देण्यात आली. शिवाय वाशिम जिल्ह्याच्या वतीने पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी, विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर,पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बानगावकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश देगावकर यांच्या वतीने आकर्षक श्री गणरायाची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या नियुक्तीचे स्वागत म्हणून महागणपती समोर त्यांचा सत्कार करण्यात आला.