कारंजा : कारंजा शहर पोलिस स्टेशनला रुजु झाल्यापासून ,पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचा कारंजेकराना अनेकदा प्रत्यय आलेला आहे. अशाच एका मोटार सायकल चोरी प्रकरणाचा त्यांचे मार्गदर्शनात शोध घेण्यात कारंजा पोलिसांना यश आले असून या बाबत अधिक वृत्त असे की, स्वप्निल ज्ञानेश्वर भगत वय २९ वर्ष रा . प्रियदर्शीनी कॉलेनी कारंजा यांनी दि २८ सप्टेंबर रोजी कारंजा शहर पो.स्टे. ला त्यांची मोटार सायकल क्र एम एच डिलक्स क्रं . एफ ए 1605 वाय, कि . ३२ हजार रुपये ही भारत फायनान्स कार्यालया समोरून दि. २० सप्टेंबरला ठेवून ते कार्यालयात झोपले असता, त्यांनी सकाळी उठून पाहीले तर त्यांना मोटार सायकल ठेवली होती त्या जागेवर आढळून आली नाही . व मोटार सायकल चोरी झाल्याचे कळले . त्यावरून त्यांनी जबानी तक्रार दिली असता पोलिस अधिक्षक बच्चनसिह आणि पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांचे कुशल मार्गदर्शनात तपास सुरु करण्यात आला असता दि ५ नोहेंबर रोजी मिळालेल्या माहिती वरून, पो.उ. नि. बी.सी.रेघीवाले, पो.हे.कॉ. गजानन वर, ना. पो. कॉ. अजय जायभाये यांनी मिळालेल्या गुप्त माहितीन्वये, मोटार सायकल चोरी प्रकरणातील आरोपी विनोद शंकरराव गिर्हे, वय ४५ रा शेलु वेताळ ता मुर्तिजापूर यास मुद्देमालासह अटक करून, दि ८ नोहेंबर पर्यंत त्याची पोलिस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास सुरू असल्याचे वृत्त शहर पो स्टे कडून कळविण्यात आल्याची माहिती, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदे कडे देण्यात आलेली आहे .